Thursday, December 23, 2010

प्रायव्हसी..!!!

काही वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईल कॅमेरा प्रत्यक्षात आला, तेव्हा स्कॉट मेकनेल (Scott McNealy) नावाचा एक द्रष्टा म्हणाला होता, "तुमची प्रायव्हसी आता संपली..आता या विचित्र प्रॉब्लेमचा सामना कसा करणार आहात ते ठरवा!!" अर्थातच त्याला सगळ्यांनीच वेड्यात काढलं.. पण हा भस्मासुर इतका पसरत जाईल..अशी कोणाला काय कल्पना येणार! आणि ते लोण मनांना बधीर करत,संस्कृतीकडून विकृतीकडे घेऊन जाईल..हे तर जाणत्यांना सुद्धा अविश्वसनीय!
'एम.एम.एस.' हे या भयानकतेकडे घेऊन जाणारं पहिलं पाऊल होतं. त्यानंतर शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स,  बाहेरगावच्या ट्रिप्स या सगळ्याच गोष्टी अचानक असुरक्षित वाटायला लागल्या..बंधनातून जरा कुठे बाहेर पडू पाहणाऱ्या बायकांना तर हा एक विचित्र धक्का होताच... पण फक्त बाईलाच नाही.. पुरुषांसाठीसुद्धा हा एक विचित्र अनुभव होता.. जनावरांच्या पेक्षा मनुष्य वेगळा ठरतो तो इतर सगळ्या गोष्टींसोबत 'नग्नते' बद्दलच्या त्याच्या विशिष्ट संकल्पनांनी. त्यासाठी अंग झाकणारी वस्त्रं-प्रावर्ण..स्त्री-पुरुषांसाठी नीतीमत्तेचे धर्मसंस्थांनी घालून दिलेले नियम... आणि हळूहळू आकाराला आलेला सुसंस्कृत समाज.. पण आज जेव्हा भर गर्दीत सुरक्षिततेसाठी स्कॅनिंग मशीन खालून एखाद्या व्यक्तीला जावं ,तेव्हा कॅमेऱ्यातून पलीकडे दिसणारी स्वतःची अर्धंनग्न प्रतिकृती पटत असो, नसो; संकोच, भीड बाजूला सारत आपणही मान्य करायला लागलो आहोत... ही तर फक्त दोन उदाहरणं झाली.. पण आपल्या सामाजिक जीवनात प्रायव्हसी उरलीये खरंच? कॉर्पोरेट जगात घोटाळे असतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सतत चालू असते, हे आपण ऐकून होतो. त्यावरचे सिनेमेसुद्धा आपण चघळत पाहिले. पण सध्याच्या निरा राडिया (Nira Radiya) प्रकरणाने या विषयाच्या कित्येक नव्या अंधाऱ्या बाजू प्रकाशात यायला लागल्यायत. खेळ खेळावा तसे फोन टेपिंग चे प्रकार चालू आहेत... मिडिया नामक एक भयावह राक्षस यातच आपले हातपाय पसरून फोफावतोय... कळत नकळत आपणही या सिस्टीम नामक जंजाळात ओढले गेलो आहोत. त्याचा एक अपरिहार्य भाग बनलो आहोत.. कामात बिझी असताना मधूनच आपला फोन वाजतो.. "हमारी कंपनीने आपको एक स्कीम के लिये चुना है. आप ही है वह भाग्यशाली विजेता.."फोनवरची बाई किणकिणत्या आवाजात असंच काही निरर्थक बोलत राहते..कामाच्या धबडग्यात आपणही विसरून जातो. आणि अचानक कधीतरी आपण विचार करू लागतो, की यांच्याकडे आपला नंबर गेला कसा, कुठून?? मार्केटींगच्या जमान्यात मोबाईल कंपन्या नंबर्सची लिस्टच्या लिस्ट चक्क विकतात.. हे आपल्या भोळसट स्वभावाच्या लक्षातच येत नाही!
हे सारं बाजूला राहिलं.. यामध्ये आपण विशेष काही करू शकत नाही...आपण फक्त मूक प्रेक्षक असतो.पण आपण स्वतः हून देत असलेल्या स्वतःच्या माहिती बद्दल ('Voluntary Information) काय??? ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, याहू मेसेंजर, ब्लॉगिंग हे सगळं करताना आपण स्वतःची किती माहिती अशीच अक्षरशः उघड्यावर टाकत असतो... नेटसाव्ही होण्याच्या, किंवा आपण तसे आहोत असं जगाला दाखवण्याच्या डेस्परेट प्रयत्नात वाहत जातो आपण.. आपल्यापैकी किती जण नवीन लॉग इन करताना सेक्युरिटी टर्म्स वाचतात, प्रायव्हसी सेटिंग्जकडे लक्ष देतात.. आपली माहिती, आवडीनिवडी, छंद, फोटोज हे सगळं कोण वाचतंय, ही माहिती कुणापर्यंत जातेय, तिचा पुढे काय आणि कसा वापर होण्याची शक्यता आहे याकडे डोळे झाकून दुर्लक्ष करतो आपण.. सगळे धोके, निसरड्या पायवाटा माहिती असून सुद्धा.. आणि हे आपल्यावर कोणी लादलेलं नाहीये. आपण होऊन हे सगळं स्वीकारलंय..
एकीकडे साधी आपली डायरी आपल्या आई-बाबांनी वाचली तरी चालत नाही आपल्याला.. आणि दुसरीकडे सगळी माहिती अक्ख्या जगाशी शेअर करण्यासाठी का धडपडतोय आपण सगळेच?? ग्लोबलायझेशन, लिबरालयझेशन च्या आजच्या धावत्या युगात सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत आपला जंगलीपणाचा,मागे जाण्याचा प्रवास तर सुरु नाहीये न?? प्रायव्हसी ची व्याख्या बदलते आहे हे खरंच...पण मुळात ती आता उरली आहे का,खरंच!!!!??

5 comments:

  1. Rushikesh S. Aravkar
    (http://www.facebook.com/rushikesh.aravkar)

    Spruha tu kharach khup sundar riti ne vichaar mandtes.........2good
    aapan vichaar karayla hava.... The real issue is that people have not yet learned how to be productive and use social media. aapan privacy settings cha vapar tar karto pan friends list mothi karnya saathi kontya hi anolkhi manasala add karto this is not called as being social..... aapan yogya kaalji gheun hya social media cha vapar karayla hava!!!

    ReplyDelete
  2. Thanx Rushikesh..What u r saying is absolutely true!!

    ReplyDelete
  3. This is terrific, but very true. kadhi kunacha kasa MMS banavun publish kela jail ani kadhi apalya photocha gairvapar hoil sangata yene avaghad zalay.

    ReplyDelete
  4. टू द पॉइंट लिहिले आहेस, व्हेरी गुड.

    प्रायव्हसी लिकचा सर्वात मोठा फटका पहिल्यांदा अमेरीकेतील "वॉटरगेट" प्रकरणात बसलेला दिसतो. त्यानंतर CIA आणि एकुणच अश्या संस्थांना अमेरीकेत आवर घालायचा निष्फळ प्रयत्न झाला, पण तंत्रज्ञान जितकं प्रगत झालं तितकं हे अशक्य होत गेलं. परदेशी पाहुण्यांच्या खोलित, विमानात माईक्स, कॅमेरे लपवणे वगैरे गो्ष्टि CIA,MI-5, KGB, Mossad अश्या गुप्तहेर संस्था सढळ हाताने करु लागल्या.

    सध्या जगभर "विकिलिक्स" प्रकरण झाल्यानंतर आपल्या देशासकट जगभर भरातील बड्या धेंडांची गोची झालेली बघतोच आहोत. पण हे आता थांबवणं अशक्य आहे.

    बाकि तु वैकक्तिक काळजीबाबत म्हणालीस ते १००% बरोबर आहे. माझ्याकडुन देखिल मी कुठलेही कॉन्टॅक्ट लिक होणार नाहित याची काळजी घेत असतोच. FB - Orkut वरती शक्यतो विचारल्या शिवाय मी मुलींचे फोटॊ टॅग करत नाहि. अनेकदा सर्व्हे करायला माणसे येतात, आपल्या ५ मिनिटांमुळे बिचार्‍याला २-४ रुपये मिळतात म्हणून कधी कधी मी त्यांना उत्तरे देतो देखिल, पण सुरुवातीलाच सांगतो - "E-mail ID किंवा कुठलाही नंबर देणार नाहि, मान्य असेल तर ठिक नाहितर मला उत्तरे द्यायची नाहि."

    यामागे कारण असे कि नंतर हेच नंबर/आयडि अजुन १० मार्केटिंग वाल्यांकडे जातात कॉल्स - मेल्स तर त्रास देतातच पण देशाच्या सिक्युरिटिलादेकखिल ोका असतो कारण हेच नाव, नंबर, पत्ते वापरुन SIM वापरले जातात. हल्ले झाले कि चौकशीत कळतं कि ही डुप्लिकेट माहिती वापरुन त्यांनी SIM मिळवले होते.

    ReplyDelete
  5. Nice Article! Mudde mandanyachi tuzi paddhat khup sahaj aahe! Asach lihit ja!

    ReplyDelete