Friday, December 17, 2010

'सारी डे'

दिवस किती भरभर जातात..आज माझी एवढीशी चिमुरडी बहीण कॉलेजमध्ये 'सारी डे' साठी नट्टापट्टा करून निघत असताना मी तिच्याकडे बघतच राहिले..झर्रकन पाच-सहा वर्ष मागे जाऊन आले मी..माझा पहिला 'सारी डे'.आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागून आईशी वाद घालत,हि नेसू की ती नेसू करत मग ह्याच्यावर हाच 'सेट' हवा...शी आई,हे किती ऑड दिसेल असा आरडा ओरडा करत मी झोपायला गेले,तीच उद्याची वाट पाहत..त्यादिवशीची सकाळ पहिल्यांदाच आईने हलवून न उठवता उजाडली..जरा जास्तच लवकर!!!साडी नेसून तयार होऊन आरशात स्वतःला न्याहाळताना वेगळंच काहीतरी वाटत होतं..
  असं म्हणतात की जेव्हा  एखाद्या मुलीला ती सुंदर असल्याची पहिली जाणीव होते होते,त्या दिवशी ती जगातली सर्वात सुंदर तरुणी असते!!आणि मला तशी जाणीव करून देणारा हाच तो दिवस..:-) अर्थात माझ्या मनाने मी आज 'फारच सुंदर'दिसतेय असं सांगून टाकलेलं असल्यामुळे मी वेगळ्याच नादात  होते..आजूबाजूला कौतुक करणारी मित्रमंडळी, लखलखते flashes, आणि सगळ्यात  महत्त्वाचं.. अस्फुट  काहीसं जाणवू  लागत  असताना एका महत्त्वाच्या व्यक्ती  कडून  हवीहवीशी  ,अपेक्षित ,surrender झाल्याची नजर..त्यादिवशी गालावर आलेलं हसू हे नंतर माझं मलाही कध्धीच दिसलं नाही...अवखळ वयातल्या सगळ्या  गोष्टी खऱ्या होत नाहीतच..आणि कदाचित तेच चांगलं आहे..मागे वळून पाहताना त्या नजरेचा एक छोटासा कवडसा सुद्धा मनात नकळत जपला गेलेला..असा अचानक कधी गवसतो..आणि मी पुन्हा एकदा जगातली सर्वात सुंदर तरुणी झालेली असते!! 

10 comments:

  1. "एखाद्या मुलीला ती सुंदर असल्याची पहिली जाणीव होते होते,त्या दिवशी ती जगातली सर्वात सुंदर तरुणी असते!!आणि मला तशी जाणीव करून देणारा हाच तो दिवस..:-) अर्थात माझ्या मनाने मी आज 'फारच सुंदर'दिसतेय असं सांगून टाकलेलं असल्यामुळे मी वेगळ्याच नादात होते..आजूबाजूला कौतुक करणारी मित्रमंडळी, लखलखते flashes, आणि सगळ्यात महत्त्वाचं.. अस्फुट काहीसं जाणवू लागत असताना एका महत्त्वाच्या व्यक्ती कडून हवीहवीशी ,अपेक्षित ,surrender झाल्याची नजर.."


    - masterpiece in post!
    हंऽऽऽ आम्ही सुध्दा किती जणींसमोर कसे सरेंडर झालो होतो ह्याची आठवण करुन दिलीस ..... BTW .... साडि नेसलेल्या मुलीं समोर मुलं खरच झटक्यात सरेंडर होतात हे मान्य!

    येऊ द्या अजून .... वाट बघतोय पुढच्या पोस्टची.

    ReplyDelete
  2. SPRUHA ,


    U KNOW , WHAT ? THIS IS THE POEM " MUGDHA " BY SPRUHA SHIRISH JOSHI .

    THIS CAN NOT B A SIMPLE BLOG POST.

    ReplyDelete
  3. वाह स्पृहा तू फारच छान लिहिले आहेस..आम्ही सर्व मुलं देखील याची फार आतुरतेने वाट बघत असतो..रोज रोज त्या पंजाबी, जीन्स मध्ये दिसणाऱ्या त्याच मुली साडी मध्ये काय दिसतात....?? खरंच एका मुलीचे जे सौदर्य खुलून येते ते साडी मुले..कदाचित एकच हा दिवस आहे, जो एकही मुलगा कधीच त्याच्या कॉलेज जीवनात चुकवत नाही...!!!

    ReplyDelete
  4. so, finally your much awaited entry in the blogsphere!! with a abng, i might add!

    ReplyDelete
  5. "Agadi asach ghadala hota....!!!!:-) Tula kasa kalala???...hahahaha!!! "

    ReplyDelete
  6. स्पृहा, खूप छान लिहिलंय. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असं एकदातरी घडलेलं असतंच. एकदम आठवले ते कॉलेजचे दिवस.

    तुझी कविता सकाळ च्या प्रीमियर मासिकात वाचली होती. मस्त करतेस कविता. इथे पण वाचायला आवडतील

    ReplyDelete
  7. thanx all...Overwhelmed by the response..:-)

    ReplyDelete
  8. saree day ...ha kari ek divas aplya ruiat VPM ne manya kela asala kahi khaas mulina baghayala

    ReplyDelete
  9. khup shan lihile aahes spruha, ekdam college madhe gelyasarkhe vatale.

    ReplyDelete
  10. Nice... Remind me the Old Days..

    ReplyDelete