Sunday, January 9, 2011

अजून आहे तिथेच राधा..!!

अजून आहे तिथेच राधा,
अजून आहे भरले गोकुळ;
श्यामनिळ्याच्या आठवणींनी 
अजूनही मन होते व्याकूळ!

यमुनेच्या काळ्या डोहावर
अजून उठती तुझे तरंग,
अजून वाऱ्यावरुन येती
मुरलीचे ते सूर अनंग.

अस्तित्वाच्या रूढार्थाला 
छेदून जाते तुझीच छाया,
'अनया'च्याही मनात दाटे
तुझीच अनवट काजळमाया!

जगणे सारे निळेच माझे,
'प्रेमयोग'हा तुझा मुकुंदा;
विरत चालले भरले गोकुळ,
अजून आहे तिथेच राधा..!!

-स्पृहा .

9 comments:

 1. sexy!

  झक्कास झालीये.

  ReplyDelete
 2. Saurabh,Harshal,Rushikesh,Ketaki n Kaustubh..thanx.

  ReplyDelete
 3. सुंदरच.... ही कविता वाचून इंदिरा संत यांची "कुब्जा" ही कविता आठवली.

  अजून नाही जागी राधा
  अजून नाही जागे गोकुळ
  अशा अवेळी पैलतीरावर
  आज घुमे का पाव मंजुळ ..........

  ReplyDelete