Saturday, May 7, 2011

मालिका.. जुन्या..तरीही ताज्या!!

तुम्हाला एक सिक्रेट सांगू??हल्ली मला टीव्ही वर सध्या सुरु असलेल्या मालिका बघण्यापेक्षा जुन्या मालिकांचा री-टेलिकास्ट बघण्याचा नाद लागलाय!!!श्रीकृष्णा,किंवा महाभारत हे खूप आवडीने बघते मी हल्ली..'रामायण' सुरु होती तेव्हा मी खूपच लहान होते..'लोकांनी टीव्हीची पूजा करणं' या अशा आख्यायिकाच मी ऐकल्या आहेत..पण 'महाभारत युगा'ची मात्र मी साक्षीदार आहे!!पुनीत इस्सार चा क्रूर पण तरणाबांड दुर्योधन,रूपा गांगुलीची लांबसडक,काळ्याभोर केसांची रुपगर्विता द्रौपदी,पंकज धीरचा धीरगंभीर कर्ण...आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती...नितीश भारद्वाजचा श्रीकृष्ण...मी रविवारची आतुरतेने वाट बघण्याचं एक कारण होतं,महाभारत...टीव्हीला डोळे चिकटवून बसलेली असायचे मी..मोठी झाल्यावर जेव्हा 'युगंधर' कादंबरी वाचली,तेव्हा श्रीकृष्ण म्हणून नितीश भारद्वाजचाच चेहरा दिसला प्रत्येकवेळी...इतकं मनात बसलंय 'महाभारत'!!! पण खरंच सध्याचे काही बिनडोक रिअॅलिटी शोज आणि आचरट फॅमिली ड्रामे पाहण्यापेक्षा मला ते खूपच सुखावह वाटतं..
'फ्रेंड्स' नावाची एक अप्रतिम सिरीयल..हे नाव वाचून आत्ताही तुमच्यापैकी काही जणांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल..ती कधीही चालू असेल न,तरी माझ्या हातातला रिमोट(ज्याचं 'सतत चॅनेल बदलणं' हे काम इतर वेळी सतत चालू असतं!!)अक्षरशः कोणीतरी संमोहित केल्यासारखा गळून पडतो..त्या पात्रांबरोबर मी त्यांच्या आयुष्यात शिरते..जोए,मोनिका,फिबी,रेचल,रॉस आणि शॅन्डलर ..मॅड,मॅड,मॅड माणसं सगळी!!!! 'फुल हाउस' नावाची अशीच एक बहारदार कौटुंबिक मालिका होती पूर्वी..आणि 'कौटुंबिक'असूनही ती 'बहारदार'होती हे नवल!!! इतकं ताजं झाल्यासारखं वाटतं त्यांना पाहताना.. तो खरेपणा,आयुष्य खऱ्या अर्थाने 'जगण्या'ची वृत्ती खूप जवळची वाटते..त्यांचे प्रश्न फार गंभीर नसतात,यश खूप मोठ्ठं नसतं.. त्यांचा 'दस करोड का बिझनेस' नसतो,की त्यांना 'बिखरे हुए परिवार को एकसाथ करके दिखाना' असलं शिवधनुष्य पेलायचं नसतं.. त्यातल्या शहरी हिरोईनला नायकाशी लग्न करण्यासाठी त्याच्या गावच्या आजीला पटवायचं नसतं,किंवा भंपक डान्स शोज मध्ये जाऊन नृत्य केल्याचा अभिनय करायचा नसतो!!! थोडक्यात काय तर ही सगळी माणसं अत्यंत खरी,हाडामासाची वाटतात..ते 'अभिनय' करतायत असं वाटतच नाही..गुदगुल्या करत,कधी खुदूखुदू,कधी खळखळ,तर कधी खोखो हसवत राहतात ते आपल्याला..
आपल्याकडे एक 'देख भाई देख' नावाची सिरीयल लागायची आठवतंय?? धमाल होती नुसती..शीर्षक गीत घोळायला लागलं की नाही लगेच डोक्यात?? 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ने अशीच मजा आणली होती काही दिवसांपूर्वी.. आणि श्रीयुत गंगाधर टिपरे???या सिरीयलचं री-टेलिकास्ट एकदाही चुकवलं नाही मी..ते 'टिपरे' कुटुंबीय माझे नातेवाईक असल्याइतकी जवळीक वाटते मला त्यांच्याबद्दल,अजूनही.. आपल्याला दुर्दैवाने बुनियाद,तमस या मालिका नाही बघायला मिळाल्या..काय बहार येईल यांचं री-टेलिकास्ट झालं तर..गोट्या,बोक्या सातबंडे पुन्हा भेटायला लागले तर किती लहानगे चेहरे खदखदून हसतील..उत्तम मालिका म्हणजे मी फक्त विनोदी मालिकांबद्दल बोलतेय,असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका..झोका,प्रपंच,पिंपळपान,मेघ दाटले ...किती सुंदर होत्या या मालिका..'नक्षत्रांचे देणे' ने नकळत 'अभिरुची' म्हणजे काय ते शिकवलं.आम्ही सातवी-आठवीत असताना 'दे धमाल' नावाच्या मालिकेत काम करायचो..इतकी गंमत वाटते,आजही जेव्हा लोक या सिरीयलचा री-टेलिकास्ट आवर्जून बघतात आणि त्यातल्या निरागसतेला आजही वाखाणतात.
कदाचित या मालिका मला इतक्या आवडतात,कारण त्या मला माझ्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातात..किंवा कदाचित त्या मालिकांशी माझे काही खूप सुंदर क्षण निगडीत आहेत..प्रत्येकाची ही 'लिस्ट' वेगवेगळी असू शकेल..पण एक मात्र खरं; मालिकांपेक्षा जाहिरातीच बघाव्याशा वाटणाऱ्या आत्ताच्या दिवसांमध्ये या काही मालिका पाहणं,किंवा त्यांच्या आठवणीत रमून जाणं हे जास्त आनंददायी ठरतं..आणि यातली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे मनोरंजन TRP च्या भीषण तागडीत तोललं जात नाही!!!!

15 comments:

  1. mast mast lekh ...
    tu agadi maala kahi varshe maage gheun gelis ,,, Ramayanaachi sakshidaar mehi navatech pan mahabharata sathi sunday chi vat mehi baghayache :) ya sunday spl malikant ek ajun asayachi sanskaar mhanun .. channel DD asel bahuda..
    tuzyapramaanech kiti janana friends ni ved lavalele hip hip hurrey naavachi serial sudha suruvaatila mast hoti :),, ,algudi days, gotyaa, bokyaa barobar hasaley me khup .. ni de dhamal chya repeat telecast chi ajun vaat baghatey :)

    ReplyDelete
  2. मस्तच लिहलंय
    आमच्या घरी पहिल्यांदा TV आला तेंव्हा सर्जा-राजा (बैलांची जोडी)अशी एक मालिका येत होती ..
    ती मालिका अजूनही मनात घर करून आहे :)
    आमच्याकडे पण २ बैल होते एकाचे नाव लाडक्या आणि एकाचे नाव राजा , मला कायम वाटायचे लाडक्याचे नाव बदलून सर्जा ठेवावे .
    मी त्याला सर्जा म्हणूनच हाकही मारायचो पण तो काही जुमानायाचा नाही :(

    कदाचित या मालिका मला इतक्या आवडतात,कारण त्या मला माझ्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातात..
    खरंय :)

    ReplyDelete
  3. Mast.......Apratim.........mala ajunhi kahi malika ha lekh vachalyavar athavalya ...ChimanRao...Sanhyadricya Paulkhuna....Vadalvat.....Agnihotra..............

    ReplyDelete
  4. खरंय... स्पृहा.. महाभारत मालिका फारच लोकप्रिय झाली होती. सर्व कलाकार मंडळींची एक तयार झाली होती.प्रेक्षक त्या कलाकारांना त्याच मध्ये पहाणे पसंद करायचे.

    ReplyDelete
  5. तुला हवं असेल तर ह्यातल्या काही मालिकांचे एपिसोड आहेत I.I.T. मधे. पण खरच, काही गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळायला मजा येते!

    ReplyDelete
  6. spruha, hi de dhamal maliak mala kuthe pahayla milel? net var sapadali nahi :(

    ReplyDelete
  7. khup chhan lihala aahes........

    ReplyDelete
  8. खरंच छान आहे लेख.....प्रपंच नावाची अशीच एक चांगली मालिका होती.....आणि तिच री-टेलिकास्ट पण झालं मध्यंतरी.......आणि लेखात दिलेल्या मालिका खरंच परत बघाव्याशा वाटतात.....

    ReplyDelete
  9. khupach chaan lekh mala pan aavdanrya kititari malikanchya aathvani jagya jhalyat...durdarshan var ghar ka chirag 'jewel in the palace'navachi koriyan malika yaychi ti majhi saglyat aavdti malika....tichi aathvan prakarshane jhali...ani yach malikanchya ranget aajun ek nav yeil...te mhanje 'eka lagnachi dusri goshta'

    ReplyDelete
  10. TAMAS....15th-Aug-2013 pasun History channel var telecast honar ahe.

    ReplyDelete
  11. U just amazing spruha...lagech BALPAN aathavla........e...tula mi kahi divsapurvi Mumbai la majhya OFC samorun jataana baghitla.....!!

    ReplyDelete
  12. mast....junya aathavani jagya zalya...keep posting...

    ReplyDelete