Monday, June 20, 2011

“बहाना चाहिये..”

मध्यंतरी ती जाहिरात पहिली होती तुम्ही?? "खानेवालो को खाने का बहाना चाहिये.." फार आवडायची मला.." बहाना चाहिये..!!" सगळ्याला कारणं शोधायची सवय लागलीये.. म्हणजे शोधक वृत्तीने नाही.. खरं तर कारणं 'द्यायची' असं म्हणायला हवं! हसण्याला कारण हवं, रडण्याला हवं..सेलिब्रेशनला हवं.. एखादी गोष्ट करण्यासाठी कारण हवं.. 'न' करण्यासाठी हवं, टाळण्यासाठी तर हवंच हवं!! 'बहाणा'...हां... हा शब्द करेक्ट आहे!! अंगावर येणाऱ्या गोष्टी दूर सारण्यासाठी, जबाबदारी ढकलण्यासाठी...किती उपयोग होतो याचा!! नको त्या माणसांना टोलावण्यासाठी, हव्याशा माणसांना पटवण्यासाठी अक्षरशः मदतीला धावून येतात हे  'बहाणे'.. नकळत्या वयातच सवय लागते आपल्याला त्यांची..या बहाण्यांच्या पदराखाली दडण्याची, आपल्याला हवं तसंच, हवं तेच, आणि हवं तेव्हाच करण्याची सवय... बघता बघता आपण इतके वाहवत जातो, की आपलं जगणं हाच एक 'बहाणा' बनतो!! खरं नाही वाटत?? कुठून सुरुवात करूया 'बहाण्यांची'??!!

*अगदी लहान असताना.. 
१.शाळेत जायचं नाहीये.."आई पोटात खू$$$प दुखतंय!!" 
२.गृहपाठ केला नाहीये.."बाई, सॉरी वही घरी विसरले!!" 
३.मार्क्स कमी मिळाले..."पेपर केवढा लेन्दी होता माहितेय?? वेळच नाही पुरला!!!"
*कॉलेजमध्ये..
१. एकांकिका स्पर्धा.. " आमची एकांकिका कळलीच नाही रे!! बिनडोक होते परीक्षक!!"  २.सहकलाकाराला बक्षीस मिळालं, आपल्याला नाही.." माझ्यामुळे धरतं रे नाटक..त्याला काय **** काम करता येतंय!! मी होतो म्हणून.."
३. जी.एस. ची इलेक्शन हरलो.. "सगळं ठरवलेलं रे..प्रोफेसर्सच्या मागे आम्ही फिरलो नाही न गोंडे घोळत!!"
*प्रेमात पडताना.. "तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयरी आहे माझी..सगळं काही सोडून देईन तू म्हणशील तर!!" 
*प्रेमात न पडताना.." म्हणजे तू खू$$$प जवळचा मित्र आहेस माझा; पण मी तुझ्याकडे 'तसं' कधी पाहिलंच नाही!!
*लग्न करताना.." 'या'च्या पेक्षा 'तो'च बरा..जरा बोरिंग आहे..पण धाकटी बहिण आहे.. भावांचं झंझट नाही!!!"
*काम करायला लागल्यावर.. आसपासच्या लोकांना मिळणारं काम ,पैसा, प्रसिद्धी बघताना..
१. "काय म्हणून 'सेलिब्रिटी' म्हणून मिरवतात रे हे.. दिडकीची नाही अक्कल.. आम्ही अजून 'प्रोफेशनली' उतरलो नाहीयोत न..म्हणून!! 
२. "कामं मिळवण्याचे रस्ते वेगळे असतात रे यांचे..आम्हाला नाही हो असली 'कॉम्प्रोमायझेस' करायची!!!" 

घरी-दारी,शेजारी-पाजारी सतत सुरु असणाऱ्या बहाण्यांचे हे काही प्रातिनिधिक नमुने!! अगदी हेच नाही..पण यांच्यासारखे असे कित्येक उद्गार आपण रोजच्या रोज ऐकत असतो..किंवा बऱ्याच वेळा आपण स्वतःच 'उद्गारवाचक' असतो!!! का होतं असं? विचार केलाय कधी? मीसुद्धा आहे या 'लीग' मध्ये...एवढी निगेटीव्हिटी, इतकी कृत्रिमता कुठून येते आपल्यात?? खुलेपणाने समोरच्याला दाद देणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या यशात, आनंदात मनापासून सहभागी होणं विसरलोय का आपण?? का समोरच्याचं अपयश मजेशीर वाटतं?? इतकी विघ्नसंतोषी वृत्ती कशामुळे झाली आपली??? स्वतः मोठं होण्याच्या नादात, आपण आसपासच्या सगळ्यांनाच तोडत निघालोय..एवढी कसली मस्ती ही?? शेवटचं दुसऱ्यांसाठी म्हणून काय केलं होतं? त्यांना बरं वाटावं म्हणून..स्वतःला विसरून?? फक्त मी, माझं, मला..बस!!

....असे नव्हतो आपण...हुश्श..स्वतःशीच निदान आज एवढं तरी कबूल केलंय कित्येक दिवसांनी..जरा हलकं वाटतंय.. इतके दिवस आपण स्वतःलाच फसवत होतो, हे मान्य करणं, म्हणजे एक नवी सुरुवात असेल का?? बदलाच्या दिशेने.. मोकळे पणाच्या दिशेने.. निरागस हास्याच्या दिशेने.. हे एवढं करायला तरी 'बहाणे' नकोत!! नाहीतर आरशासमोर उभं राहिल्यावर उद्या मनच म्हणायचं.." मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..!! "
  
  

9 comments:

  1. वाह वाह... अजुन अनेक बहाणे सांगता येतील.
    मी तर ऑफिसच्या बहाण्यांसाठी दोन-तीन पानं सहज लिहून काढेन :) :)

    ReplyDelete
  2. आरशासमोर उभं राहिल्यावर उद्या मनच म्हणायचं.." मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..!! "

    :)
    छान लिहलंय ..



    सलील कुलकर्णींचा एक लेख वाचला होता - विरोधासाठी विरोध करायचा, आपण कसे वेगळे आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करायचा
    त्याची आठवण झाली .

    ReplyDelete
  3. Sunder lekh!!!!!!Masta vishay ani vichar mandnyachi paddhat suddha!!!!!!!Asach lihit raha!!!!:-):-)

    ReplyDelete
  4. जर मी कवी असतो तर निट सांगू शकलो असतो तरी पण सांगतो मस्त आहे

    ReplyDelete
  5. khup chan lihila ahes agdi rojchya ayushyat ghadnarya goshti.

    ReplyDelete
  6. Hey.Sorry for this seemingly unrelated comment,but i did not find place to put this.Were you part of Ga.Ma.Bh.Na.? If you were I would like to say the play was amazing.The depiction touched heart as much as the book.(If were not then I am extremely sorry and you may delete the comment if you want.)

    ReplyDelete
  7. khup sundar.. "bahana" avadala.
    किंवा बऱ्याच वेळा आपण स्वतःच 'उद्गारवाचक' असतो!
    " !!!" avadal..

    ReplyDelete
  8. Sundar aahe! Concept, maandani, shabd saare aawadle!

    ReplyDelete
  9. very nice Article, inspired after reading

    ReplyDelete