Wednesday, July 13, 2011

अधीर श्रावण

अधीर श्रावण, मनात पैंजण
उनाड वाहे वारा,
आठव येता तुझी माधवा
देह सावळा सारा..
अशांत यमुना, उदास गोकुळ
उधाणलेला पूर,
दूर तिथे तू, तरिही छळतो 
तुझा पावरी सूर.
कोमल स्वप्ने, मधुरा भक्ती
जपते राधा वेडी,
पायांमध्ये जणू घातली 
कुणी फुलांची बेडी!
हळवे तनमन, सरले 'मी'पण 
गर्दनिळीही भूल,
निळसर मोहन, राधा झाली 
निशिगंधाचे फूल..!!

-स्पृहा.   

19 comments:

  1. Too Good...Like it...Plz keep writing... :)

    ReplyDelete
  2. AWESOME.. mala hya shabdaatli rhythm faar bhaari waaTli!! :)

    ReplyDelete
  3. aahhhh...mast ch...kya bat स्पृहा..! :)

    ReplyDelete
  4. kiti sundar ,, vah vah ,,, apratim ,, kiti ga sahi :) :)

    अधीर श्रावण, मनात पैंजण
    उनाड वाहे वारा,

    :)

    ReplyDelete
  5. Videsh,Nikhil,Prasad,Jui and Reshma..Thanx a lot!!

    ReplyDelete
  6. पायांमध्ये जणू घातली
    कुणी फुलांची बेडी!

    aawadali kavita :)

    ReplyDelete
  7. शब्दांचा अगदी जपून केलेला वापर आवडला....!!!

    ReplyDelete
  8. स्पृहा !आताच तुझे फेसबुक वर फोटॊ पाहिलेत व ही तुझी मी वाचलेली पहीलीच कविता वाचता वाचता आवडून गेली !

    ReplyDelete
  9. हळवे तनमन, सरले 'मी'पण
    गर्दनिळीही भूल,
    निळसर मोहन, राधा झाली
    निशिगंधाचे फूल..!!

    wah.......

    ReplyDelete
  10. छान लिहिलं आहेस स्पृहा! काही fresh वाचायला मिळण्याचं सुख काही औरच असतं.

    ReplyDelete
  11. सुंदर कविता!!
    बेला शेंडेच्या 'रूनझुन रूनझुन नादात पैंजण' या गाण्याची आठवण झाली
    त्याशी साधर्म्य असणारी तरीही सुरेख!

    ReplyDelete
  12. छान आहे कविता. किती सहजरित्या शब्दात उतरली आहे..

    ReplyDelete
  13. खूप खूप खूपच छान!

    ReplyDelete
  14. खूप खूपच छान!

    ReplyDelete
  15. khup chhan kavita !! mala tu khup aavadtes spruha !

    ReplyDelete