Thursday, July 25, 2013

विद्या ताई

प्रिय विद्याताई ,
माझ्या अभिव्यक्तीचं 'कविता' हे माध्यम तुम्ही मला शोधून दिलंत. माझ्यासाठी तुमचं 'असणं' खूप महत्त्वाचं आहे. ही  कविता तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित… 

एक सृजनाचा स्पर्श 
लाभे असा अवचित,
पेरूनिया जाई स्वप्ने 
कसा हसऱ्या डोळ्यांत.. 

काही बोलावे- सांगावे
कधी उगीच भांडावे,
गुरुशीच मैत्रीचे हे 
नाते आगळे जडावे.. 

नाही अडकली कला 
चित्रकलेच्या तासात,
उधाणल्या पाखरांच्या 
रंग भरले मनांत.. 

माणसात धुंडाळला 
नवा पोत, नव्या रेषा;
कितीकांना शिकविली 
बोलायाला नाट्यभाषा!

सारे बोलणे अबोल 
मनी आभाळाची माया ,
मन हिरवे अजुनी 
झिजे चंदनाची काया .. !!

- स्पृहा.      


13 comments:

  1. स्पृहा,खूप छान लिहिले आहेस तू..लिहित राहा :-)

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर आणि ह्रदयाला स्पर्शून जाणारे लिहिले आहेस स्पृहा..

    ReplyDelete
  3. Spruha Mam...Tumhi Lihit Raha...Khup Manapasun Lihita Tumhi...Please..Tumhi Lihit Raha :)

    ReplyDelete
  4. तुमची ही कविता व एकंदरीतच तुमचा ब्लॉग, दोन्ही आवडले. तसेच "एका लग्नाची दुसरी गोष्ट" व "उंच माझा झोका"मुळे तुमच्या अभिनयाची व्याप्ती खूप मोठी आहे असे वाटले.

    पुढील लेखनासाठी तसेच अभिनयक्षेत्रातील तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. Salute to d person who has created so many talented personalities like u....and its nice to get to read ur creation after such a long time spruha.

    ReplyDelete
  6. एवढी सुंदर गुरुदक्षिणा मिळण्याचे भाग्य फार कमी गुरुंना लाभते.
    खुप छान.

    ReplyDelete
  7. स्पृहा,

    जीवनाच्या प्रत्येक वाटेवर कोणी ना कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याला गुरु म्हणून लाभतच असते आणि अगदीच कोणी नाही लाभले तर आपण आपल्या अनुभवावरून स्वतःलाच मार्गदर्शन करत स्वतःचे गुरु बनतो. मग त्या शिक्षणातून जे काही साध्य केले ते सर्वप्रथम गुरुचरणी भेट म्हणून देताना जो काही आनंद आपल्याला होतो त्याच्या किती तरीपट आनंद गुरुंना होत असतो, अगदी तसा जसा आईला पहिल्या पगारात साडी भेट देताना होतो.
    कवितातर मस्तच लिहिलीस आणि आशा करतो कि ज्यांच्यासाठी लिहिलीस त्यांना तू हि भेट म्हणून केव्हाच पाठवली किंवा स्वःता जाउन दिली असशील अन नसेल दिली तर दे. मग त्यांच्या कडून मिळणारी दाद वा सुधार घेण्यात तुला जी काही धन्यता वाटेल ना ते आमच्या १००० पानी comment मध्ये कधीच वाटणार नाहि.
    तशी तुझी हि पोस्ट एक-दिड वर्षाचा आराम घेऊन आली. I Mean २०११ नंतर २०१३ मध्ये.
    Keep it up …. :)

    ReplyDelete
  8. Khupte tithe Gupte madhe Vidya Tai patwardhan yaana pratham pahile. Umesh ani Priya Kamat chya episode baddal bolat aahe me. Khuup chan personality aahe tyanchi. :) :)

    ReplyDelete