Wednesday, January 1, 2014

मावळतीच्या वाटेवरती..

मावळतीच्या वाटेवरती 
सोनकेशरी रंगसोहळे,
कधीकधीचे घुसमटलेले 
क्षणात होती श्वास मोकळे.

ओलांडून ये तुझा उंबरा 
पल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी 
माझ्यामधली तीच बाहुली !

रास मांडशी पुन्हा नव्याने 
जुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!

सुटली वेणी अशा अवेळी
निळकर वारा खेळ मांडतो,
उरली-सुरली सरली राधा 
अवघ्या देही श्याम नांदतो !!

- स्पृहा. 

41 comments:

  1. Spruha.... classsssss !!!!!! Apratim !!!!

    ReplyDelete
  2. Waahhh..... Bole toh ekdum jhakaasss..
    Very nice and excellent shabd-julavani... Well,will love to see more of it.......

    ReplyDelete
  3. Mast !!! Navin Varshachya Shubheccha !!! Aani asach lihit raha !!!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. माझिया भावनांचीही अशीच आहे मोळी
    जश्या तुझिया या चार ओळी

    ReplyDelete
  6. नवी होऊनी मीही आले
    पायी माझ्या जुन्याच काटा

    अप्रतिम

    ReplyDelete
  7. Its nice gift from you on New Year .Seriously brilliantly written.Last two lines say that you are 'Thinking Actress'

    ReplyDelete
  8. ओलांडुन ये तुझा उंबरा 
    पल्याड देशी तुझी सावली,
    जपून आहे मीही अजुनी 
    माझ्यामधली तीच बाहुली!

    mind bogling....:) :) :)

    नवी होऊनी मीही आले 
    पायी माझ्या जुन्याच काटा
    Ithe junaach kata as mhanaych hot ka?

    ReplyDelete
  9. Khupach Chan Spruha.. Mast ahe Kavita. :)

    ReplyDelete
  10. atishay sunder spruha...shabdanmadhala olava japun thevna koni tujhya kadun shikava .. :)

    ReplyDelete
  11. really loved it Spruha...mi jitki tujhya acting chi fan ahe tyapeksha kititari jasta tujhya kavitanchi fan ahe...you're truly fab

    ReplyDelete
  12. Apratim.. Shevatcha kadva khupach awadla.. Keep it up .. :) Waiting to read more..

    ReplyDelete
  13. आशयगर्भ कविता. कित्येक दिवसांत इतकी सुंदर कविता नाही वाचली.

    ReplyDelete
  14. कदाचित मी चुकीचा असेन पण या कवितेत राधा ऐवजी मीरा जास्त योग्य वाटते कारण यात बेधुंद पणा आणि भेटण्याची आस आहे… आणि आस लाऊन तर मीरा बसली होती राधा तर नेहमी संगतीच होती……
    पण कविता मस्त आहे आवडली मला … :)

    ReplyDelete
  15. Khup aavadali mavalatichi vat.....!!!

    ReplyDelete
  16. तुझा प्रत्येक शब्द मनाच्या सागरात जाऊन मोती होतो..खूप सुंदर.

    ReplyDelete
  17. रास मांडशी पुन्हा नव्याने
    जुना चांदवा जुन्याच वाटा,
    नवी होऊनी मीही आले,
    पायी माझ्या जुनाच काटा!

    एकच नं. अप्रतिम !!

    ReplyDelete