Saturday, June 13, 2015

पाऊस

बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
सांडून जातो धुवांधार
आसुसलेलं, थबकलेलं
बरंच काही.
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..

स्पृहा

18 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Khup chan kavita ....awadli aplyala

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Thank you very much for resuming on the blog

    ReplyDelete
  5. मस्तच.....#Awesome......

    ReplyDelete
  6. छान जमलंय मुक्तक!

    ReplyDelete
  7. kharach khup kahi deun jaato paus algad aaplya mutith!!!

    ReplyDelete
  8. kharach khup kahi deun jaato paus algad aaplya mutith!!!

    ReplyDelete
  9. खूप छान उन्हात पण पाऊसात घेऊन गेलात ....:)

    ReplyDelete
  10. पाऊस अश्रू ना हि लपवनारे

    ReplyDelete
  11. पाऊस अश्रू ना हि लपवनारे

    ReplyDelete
  12. नमस्कार
    तुझ्याशी संवाद साधता आला ही आनंदाची गोष्ट आहे
    आरवलीच्या लघाटे व परशुरामच्या येथील कुटुंबांच्या मुळे आम्ही तूझी प्रगती अनुभवतो आहोत। दीक्षित जोशी लघाटे अशी विविध ठिकाणाहून तुला मिळणाऱ्या अनुभवातून तू तुझं जीवन समृद्ध करीत आहेस हे पाहून खूप आनंद होतो. तू कधी वाचशील हा निरोप माहीत नाही पण चंदेरी दुनियेत तू स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे कष्ट घेते आहेस त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। नात के आहे आपलं पेक्षा। आपण आपल्या माणसांचं कौतुक केल्याने त्यांचा उत्साह वाढतो। हे माहीत आहे मला।
    विद्या आशा माधुरी या सर्व ताई म्हह्णजे माझ्या सासऱ्यांच्या मित्राच्या मुली। माननीय मोरूभाऊ पाटणकर व माझे सासरे पंढरीनाथ वासुदेव पाटणकर ।। तुझी आजी ( बाबांची आई )माझी नणंद आहे। । पण इतकी सर्व छान माणसं मिळणं हे प्रत्येकाच भाग्य असत.
    मी खूप लिहिलं असलं तरी हे सर्व खूप दिवस मनात होत तुझं कौतुक करावे ।। तुमचं लग्न आम्ही दोन्ही कडून येऊन अनुभवलं । खूप सुंदर आयुष्य आहे.
    तुझ्या सर्व उत्तम आशा आकांशा पूर्ण होऊदेत हीच परमेश्वराकडे प्रार्थना।

    ReplyDelete
  13. प्राची आणि उमेश पाटणकर पुणे म्हणून पंढरी तात्या व मामा आशा नावाने दोन्ही कुटुंबाकडे आमच्या कुटुंबाची ओळख आहे।

    ReplyDelete