प्रार्थनेला उत्तर मिळतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. अगदी कट्टर नास्तिक आणि निरीश्वरवादी सोडले, तर आपण सगळेच दिवसातून एकदा तरी प्रार्थना करतो. कधी मोठ्याने, तर कधी अगदी मनातल्या मनात. देवाला सीक्रेट सांगितल्यासारखे! कधी आपल्या जवळच्या माणसासाठी, त्याला हवं ते सगळं त्याला मिळावं म्हणून, कधी कोणाची तब्येत सुधारावी म्हणून, तर कधी आपल्याच दुःख्खाचा विसर पडावा म्हणून. पण बऱ्याचदा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येतातच असं नाही; मग आपली आणखी चिडचिड होते, आणि आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना पोहोचलीच नाही की काय! का आपल्याला हवं ते उत्तर नाही मिळालं..?? पण का कुणास ठाऊक, पुन्हा डोळे मिटतात, हात जोडले जातात. कदाचित लहानपणीच्या “शुभंकरोति” आणि “ दिव्या दिव्या दीपत्कार” चे संस्कार असतील. एखाद्या गूढ शक्तीसमोर स्वत:ला सरेंडर करणं ही किती सुंदर कल्पना आहे. देवळात जाऊन दर्शन घ्यायला आवडतं मला. म्हणजे मंगळवारी सगळी कामं सोडून रांगेत उभं राहणं आणि नवसाची लाच 'ऑफर' करणं, असं दर्शन नाही हं.. खरंतर अशा ठिकाणी काही मागण्याची इच्छासुद्धा होत नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर, कोकणात हरिहरेश्वर, परशुरामाचं मंदिर, पुण्याचा तळ्यातला गणपती, शिवाजी पार्कचं उद्यान गणेश मंदिर.. आणि अनेक ठिकाणची गावागावातली अस्पर्श, 'मार्केट'चा स्पर्श न झालेली मंदिरं... तिथला उदबत्ती, धूप, दीप,कापूर, प्रसाद, यांचा एकत्र जाणवणारा सुगंध, अनवाणी पावलांना जाणवणारा फरशीचा गार स्पर्श, काहीतरी अनामिक भावनेने भरून आलेला ऊर... काही न मागताच सगळं काही पावल्याचं समाधान देऊन जातात!
मला स्वतःला आपली मंदिरं, छोट्या गावातली देवळं जितकी आवडतात, तितकीच आवडतात चर्चेस. जर्मनीला गेले असताना तिथल्या भव्य चर्चेस मध्ये जायला मिळालं. नकळत्या वयात ती सुंदर चित्रं फार खोलवर कोरली गेली मनावर. तिथल्या घंटांचा नाद, गूढ शांतता, मेणबत्त्यांच्या धूसर प्रकाशात जाणवणारा शांत काळोख, आणि प्रेमळ चेहऱ्याचे शांत पाद्रीबाबा.... जसंच्या तसं आठवतंय हे चित्र. आणि अगदी जसंच्या तसं आठवतंय तिथे त्यांनी सांगितलेलं प्रार्थनेचं महत्त्व... "अगदी मनापासून प्रार्थना करूनसुद्धा आपल्यासोबत जे घडायचं ते घडतंच.. मग त्या प्रार्थनेला काय अर्थ? देवाने आपली प्रार्थनाच ऐकली नाही, की आपलं मन किती ठेचकाळलंय, हेच त्याला कळलं नाही! मग प्रार्थना तरी कशाला करायची त्याची? तो असतो, हे मानणंच सोडून द्यावं का?...असे प्रश्न मला बरेच अडले-नडलेले लोक विचारतात. पण मला असं वाटतं की जेव्हा हा विचार येतो, तेव्हाच खरंतर प्रार्थना करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आधी कधीही नव्हतं इतकं महत्त्वाचं. कदाचित देवाला वाटत असेल, आपण आत्ता त्याची आठवण काढावी. आपल्याला जे हवंय ते मागत राहणं, म्हणजे 'विश्वास' नाही; कितीही दुःख्ख आली तरी देवाच्या 'देव'पणा वर शंका न घेणं, म्हणजे 'विश्वास'...." किती सोप्या शब्दांत त्यांनी प्रार्थना, देव याबद्दल सांगून टाकलं होतं...
आणि त्यानंतर एक मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं. आपण आपल्या देवावर विश्वास ठेवला, तर तो आपल्यावरची नजर कधीच काढून घेणार नाही.. आपण जे त्याच्याकडे मागितलंय, ते तो कदाचित कधीच आपल्याला देणार नाही, पण त्याच्या मनात त्याने आपल्यासाठी त्याहूनही काहीतरी बहारदार योजून ठेवलं असणार! अश्रू आणि दुःख्ख यांच्या पलीकडचं काहीतरी खूप सुंदर.. तेवढं गिफ्ट तर तो मला देणं लागतोच!!! कारण प्रार्थनेला उत्तर मिळतं यावर माझा ठाम विश्वास आहे..!!
अतिशय सुंदर भावना तितक्याच सुंदर शब्दात व्यक्त केली आहेस तू.
ReplyDeleteमी कुठे तरी वाचलं होतं - "प्रार्थना देवासाठी करायची नसते. देवाला त्याची गरज नसते. प्रार्थना केल्याने परिस्थिती बदलत नाही, तर प्रार्थना करणारा बदलतो."
प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळतंच, फक्त ते उत्तर ओळखता यायला हवं.
kharach prarthanene paristhiti badalate ki nahi mahit nahi pan konitari adrushyaa +ve shakti satat satat aapalyaa barobar aahe, ti aahe mag kalaji nako prayatn kara ,,, hi bhavana matra nakki yete ,,
ReplyDeletekharach prarthanet takad aahe bharakatalel man shant karun vivek jaagaa karanyaachi ,,,
n mazahi thaam vishwas aahe prarthanela uttar milatach ,,
bhagavan ke ghar der hai andher nahi :) :) :)
प्रार्थना हे संकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे.
ReplyDeleteस्पृहा तुझा लेख आणि यशोधनची त्यावरची प्रतिक्रिया.. अप्रतिम :)
ReplyDeleteस्पृहा काय सुंदर लिखाण केले आहेस आगदी अप्रतिम ............स्पृहा तुला एक विचारू ..........तू अल्फा मराठीच्या दे धमाल मध्ये होतीस न .........आणि तो झंप्या नावाचे पात्र करणारा त्याचे नाव काय ग ............बाकी ALL THE BEST
ReplyDeletekhupach sundar....tuza lekh vachun mala pan kahi lihavasa vatatay...baryach varshani......atishay sundar lihites tu....thnx for being my inspiration....
ReplyDeletebhari..........
ReplyDeleteha anubhav pratyek mansane ghetlela asun suddha tyat navinya vattay:)
ReplyDeleteapratim:):)
खूप आवडला लेख आणि ब्लॉग
ReplyDeleteखरं सांगायचं तर देव हि संकल्पना प्रार्थनेच्या मजबूत खांबावर उभी आहे
मग अगदी कट्टर नास्तिक सुद्धा या संकल्पनेवर विश्वास ठेवत असतोच वेगळं नाव देऊन एवढंच
loved it...
ReplyDeletesuperb.ata prarthana karatana majha wishwas anakhin wadhel..!!!
ReplyDeleteThank u all.. :-)
ReplyDeleteDEAR
ReplyDeleteAAPAN JE KONI AAHAT KHARCH TUMI EK MANATIL GOSHTA SANGITALI AAHE.HE SAMPURNA VISHWA EK VISHWASAWAR CHALU AAHE. MI PAN AAPLYA MANATIL VISHWAS THAM AAHE YAAS MAZA VINAMRA SHATWAR PRANAAM.
ANIL PATRE
NANDED
स्पृहा kharach aapn khup sundar vakye tiple aahi je jivnat uupyogi thareal.
ReplyDeleteaani me tumhala agnihotra maliket pahile hote tya veli idea pan navti ki tumhe it ka sundar लेख lehichal i like uuuuuu
best of luck ..स्पृहा...
Khup Chan lihila ahes. Mala watata Purna aastik kinwa Purna Nastik - donihi changla....pan khara problem hoto madhe lataknaryancha.It will be good if we can decide who we are and just stick to it.
ReplyDeleteAgain,Nice article!
स्पृहा
ReplyDeleteप्रथम तुझं अभिनंदन कारण तुझं लिखाण नेहमी प्रमाणेच उत्तम आहे. मला तुझ्याबद्दल जास्त विशेष वाटतं ते म्हणजे तू अगदी रोजच्या साध्या साध्या गोष्टींवर एवढं कसदार लिहू शकतेस, शिवाय त्यातून नेहमी काहीतरी घेण्यासारखं असतं. मी पण तोडफार लिखाण करत असतो आणि माझ्या ब्लोग वर सवडीनं पोस्टही करत असतो, तू ते बघून तुझा अभिप्राय कळवला तर मला खूप आनंद होईल. manorajya .blogspot .com हा माझ्या ब्लोग चा पत्ता.
awesome!!!!!!!!
ReplyDelete"आपल्याला जे हवंय ते मागत राहणं, म्हणजे 'विश्वास' नाही; कितीही दुःख्ख आली तरी देवाच्या 'देव'पणा वर शंका न घेणं, म्हणजे 'विश्वास'...." - सुंदर!!
ReplyDeleteप्रार्थना केल्याने आपल्याला हवे ते मिळेलच असे नाही.. आणि प्रार्थना ही इच्छा ठेवून करायला नको.. पण प्रार्थना केल्याने आपल्या मनाची उत्क्रांती होते.. आपला देव सर्व शक्तिमान आहे आणि काहीही करू शकतो हा विश्वास ठेवून at the same time आपण देवाची शक्ती ही आपले छोटे problems सोडवण्यासाठी वापरण्यापेक्षा आपले मन evolve होईल ह्यासाठी वापरावी..एकदा मन evolve झाले कि आपणच आपले problems सोडवायला शिकतो हा माझा अनुभव आहे..
प्रार्थना हा विषयच फार छान आणि बरंच बोलता येण्यासारखा आहे. पण इथे इतकेच सांगावेसे वाटते की संतांनी म्हणून ठेवलेले आहे...
ReplyDeleteदुख मे हर होई भजे, सुख मे भजे ना कोय
सुख मे हर कोई भजे, तो दुख कहासे होय.....
लेख अप्रतिम....आवडला
ReplyDeleteWaah!! Jee khush kar diya! :) Khup masst lihilayas! ani mukhya mhanje dewlaat jatanna ani tithe gelyavar je watata tyacha varnan tu ACHUK shabdat kelays! 'ASACH'hota devlaat gelyavar!
ReplyDeleteTumhi far sundar lihita. Mala tumach lihilel vachaya khoop avadta. Ata mazyakade marathi font nahiy. Mhanun he as lihitey.
ReplyDeleteSwati M. Nawale
काळजाला भिडणारे लेखन सुरेख
ReplyDeleteगुरुदेवाची कविता
ReplyDeleteविपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये….एवढीच माझी इच्छा !
दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावस अशी माझी इच्छा नाही
दु:खावर विजय मिळवता यावा…एवढीच माझी इच्छा !
माझ्या मदतीला कोणी न आल्यास
माझं बळ मोडून पडू नये….एवढीच माझी इच्छा !
माझं तू रक्षण करावस, मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाही,
तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं …एवढीच माझी इच्छा !
माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस
तरी माझी तक्रार नाही
ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात यावी…एचढीच माझी इच्छा !
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीन
दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा मझी फसवणूक करील
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये ….एवढीच माझी इच्छा!
खूपच सुंदर आणि सहज म्हणून गेलीस तू स्पृहा!
ReplyDeleteमी सुद्धा रमून गेलो माझ्या सुखाच्या दिवसात आणि बऱ्याच काही चुकांची जाणीव झाली
खरच मनापासून thanks
पुन्हा एकदा जाणीव झाली स्वताला स्वताच्या दायित्वाची