एके
काळी उत्तम दर्जाची जिमनस्टिक्स खेळाडू असलेली स्पृहा ही खऱ्या अर्थाने रमलीय ती अभिनयाच्या
क्षेत्रात . अनेक नाटके, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यातून आपल्या अभिनयाचा ठसा
उमटवणारी ही गुणी अभिनेत्री . पण तिचा श्वास आहेत ते शब्द! ..कविता...
रंग...आणि सूर... त्यावर टाकलेला हा प्रकाश !
सुंदर रूप , अत्त्यंत संवेदनशील , प्रगल्भ
असा अभिनय आणि अत्यंत भावस्पर्शी अशा कविता म्हणजे स्पृहा... आजची लाडकी अभिनेत्री
स्पृहा जोशी !’डोन्ट वरी बी हॅप्पी’ सारखं नाटक असो वा‘उंच माझा झोका’मध्ये तिने साकारलेली
रमाबाई रानडेंची आव्हानात्मक भूमिका असो, तिच्या अभिनयाची चमक तिच्या सगळ्याच
भूमिकांतून दिसली.मात्र अभिनय हा जरी तिचा ध्यास असला आणि ज्याचा ध्यास आहे त्यातच
करिअर करायला मिळत असल्याने ती प्रचंड खुश असली तरी ती मनापासून रमते ती मात्र कवितांमध्ये ..पुस्तकांमध्ये...
सुरांमध्ये आणि रंगांमध्ये सुद्धा!
ती
सांगत होती, ‘’मी शुटींगसाठी, नाटकांसाठी कुठेही गेले वा मालिकांच्या चित्रीकरणात
व्यस्त असले तरी माझ्यासोबत कायम एक पुस्तक असतंच; आणि त्याच बरोबर माझी आवडती
गाणीसुद्धा. जरा रिकामा वेळ मिळाला की एकीकडे कानात हेड फोन घालून गाणी ऐकत ऐकत
पुस्तक वाचायचं हा माझा छंद आहे.मला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं..अगदी शास्त्रीय
संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत...पणसाॅफ्ट म्युझिक आवडतं. ढॅणढॅण म्युझिक
नाही आवडत. शास्त्रीय संगीतात मला किशोरीताई आवडतात, भीमसेन जोशी , मालिनी
राजूरकर, उस्ताद राशीद खान आवडतात, कौशिकी चक्रवर्ती आवडते. तर सुगम / चित्रपट
संगीतात अर्थातच लताबाई , किशोरदा, रफी, आशाताई, सोनू निगम , शंकर महादेवन, श्रेय
घोषाल हे सगळे आवडतात.मीही गोविंद पोवळेंकडे दीड दोन वर्षं गाणं शिकलेय.बऱ्यापैकी
गाऊ शकते. जे मला हसणार नाहीत याची मला खात्री असते अशांपुढे मी गातेही .....मात्र
पुढे वेळेअभावी गाणं शिकणं जमलं
नाही.मात्र सूर सतत सोबत करत राहिले !’’
मात्र
स्पृहाची खरी दोस्ती आहे ती शब्दांशी ...कवितांशी....तीअप्रतिम कविता करतेआणि
तितक्याच उत्कटतेने ती कविता वाचतेही !
ती
म्हणाली,’’ हो हे खरंय ! कविता हे माझं मध्यम आहे . माझा श्वास आहे... माझी‘प्रायव्हेट
स्पेस’ असंही म्हणता येईल.अभिनय हा माझा ध्यास असला व त्याच क्षेत्रात करिअर
करण्याचं भाग्य मला मिळालं असलं तरी या क्षेत्राचं क्षणभंगुरत्वकाम करताना सतत
जाणवत राहतं. इथली प्रसिद्धी , इथलं कौतुक हे सारच औट घडीचं आहे याची प्रखर जाणीव
होत राहते.....कधीवैफल्याचे, उद्विग्नतेचे क्षण येतात, कधी कंटाळा येतो .. कधी‘सीन’गणिक
भावनांचे‘ऑन–ऑफ’करताना तर कधी कुणाचे मूड सांभाळताना ...कधीघर आणि करिअर याचा तोल
साधताना तर कधी आमचं माणूसपण व आमचं अभिनेत्री असणं यात फरक न करता येणाऱ्या
प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भार सोसताना सगळंच असह्य होत जातं.याचा निचरा होण्याची
तीव्र गरज जाणवते .. तेव्हा माझी कविता मला साथ देते . इतरकुणी हे कोणाकडे तरीबोलून
मन मोकळं करतात . मी कवितेतून व्यक्त होते..कवितेतूनच मन मोकळं करते...
उदाहरण
द्यायचं तर मी जेव्हा ‘उंच माझा झोका’ मध्ये ‘एण्ट्री’ केली तेव्हा तोपर्यंत
छोट्या रमाचं पात्र लोकप्रिय झालेलं होतं. आता मला मोठी झालेली रमा नव्याने प्रस्थापित
करायची होती . ते‘ट्रान्झिशन’ लोकांच्या पचनी पडेल , ते नव्या रमाला स्वीकारतील,
आधीच्यारमाचा प्रभाव पुसला जाईल हे पाहण्याचं, साध्य करण्याचं आव्हान माझ्यापुढे
होतं. ते आव्हान झेलताना मी व्यक्त होण्यासाठी कविता लिहिली ‘ पर्व‘ नावाची...माझी
कविता अशी सतत मला साथ देत असल्याने मला कुणाकडे जाऊन मन मोकळं करायची गरज भासत
नाही. तसंच अभिनय करतानाही मला त्याचा उपयोग होतो ‘’
शब्दांइतकीच
स्पृहा रमते ती रंगकामात .चित्रं रंगवण्यात.....
ती
हसत हसत सांगते,’’ मला अजिबात चित्रं काढता येत नाहीत.पण मला चित्रं रंगवायला खूप
आवडतात . मी एकदा ‘क्रॉसवर्ड’मध्ये फिरत होते तेव्हा मला तिथे खूप ‘कलरिंग बुक्स’
दिसली . मी ती घरी घेऊन आले. रंगीत पेन्स आणली. मला जेव्हा जेव्हा रिकामा वेळ
मिळतो तेव्हा ती चित्रं रंगवत बसायला मला खूप आवडतं. मी त्यात मनापासून कितीही वेळ
रमते.मी त्याबाबत इंटरनेटवरही माहिती शोधली. तेव्हा माझ्या असं लक्षात आलंकीही खूप
चांगली थेरपी आहे . सायकोथेरपी...यात तुम्ही खूप मोकळे होत जाता ...मलाखरंच तसंच
होतं. त्यात खूप आनंद मिळतो ...मोकळं झाल्यासारखं वाटतं..’’
स्पृहाला
आणखी काय आवडतं माहित आहे?
ती
घरात असली, तिला जरा रिकामा वेळ असला की कपाट काढून , रिकामं करून ते पुन्हा
लावायला खूप खूप आवडतं
ती
म्हणाली, “ लग्नाआधीसुद्धा , आईकडे असताना माझ्या बहिणीचे व माझे कपाट मीच लावायची
.मला ते मनापासून आवडतं..सगळे कपडे खाली काढायचे , नीट घड्या घालून पुन्हा जागच्या
जागी ठेवायचे, सगळी ज्वेलरी काढायची , ती पुन्हा नीट लावायची हा माझा अत्यंत आवडता
‘टाईमपास’ आहे .माझा सगळा रिकामा वेळ मी त्यात सत्कारणी लावते. मात्र घर सजावटीतलं
मला फारस समजत नाही. त्यामुळे घराची अंतर्गत रचना बदलणं, त्यात नवीन काही करणं हे
काही मी फारसं करायला जात नाही ...पण मला स्वयंपाक आवडतो . त्यामुळे मला अगदी ५-६
तास रिकामा वेळ आहे असं जर लक्षात आलं तर मग मी स्वयंपाक घरात जाऊन माझे काही खास
पदार्थ बनवते . पण केक वगैरे सारखे किचकट,
वेळखाऊ पदार्थ बनवायला मात्र मला नाही आवडत .त्यापेक्षा मला पुस्तक वाचायला आवडेल...’’
स्पृहाचा
अभिनय, तिचे लिखाण तिचा चेहरा जितका पारदर्शी आहे तितकंचतिचं बोलणंही पारदर्शी
आहे...नितळ...पण आशयघन !..इतक्या लहान वयात इतकी समज,प्रगल्भता अभावानेच दिसते ...
Nice... please send your cell number wants to talk...9011087406
ReplyDeleteहल्ली तुम्ही ब्लॉग वर जास्त लिहीत नाही मॅडम . मग तुमच्या कविता वाचतो . पहिल्या पावसानंतर "लोपामुद्रा " मधील "पहिला पाऊस" कविता वाचली , म्हटली . तुमच्या कविता मन मोकळं करतात .
ReplyDeleteHi Spruha, woul like to invite you to write for our upcoming Diwali digital magazine 2017 please provide your email or email me @ kokatayash@gmail.com
ReplyDeletethanks
Aishwarya Kokatay
Managing editor
www.marathicultureandfestivals.com
खूप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा .आयुष्य आपल्या कवितांसारखच प्रवाही वाहू दे, नेहमी सुख राहू दे , हि मनापासून प्रार्थना .
ReplyDeleteKhup chan🙌
ReplyDeleteKhup chan🙌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteDear Spruha, please have a look to my blog@गावठी http://anajavkar.blogspot.com/2018/05/blog-post_29.html
ReplyDeleteNice article - Ankush Gawade
ReplyDeleteदे झुगारून सारे मुखवटे,
ReplyDeleteश्वास तू घ्यायला शिक,
आहेत अमृतकण ही आकाशी,
तू ते वेचायला शिक.
जरी अनेक तोंडे वदली,
परी अंतिम परमसत्य एकच,
किस्से असतील अनेक नकोसे,
तू कान मिटायला शिक.
पायही सुटेल जमिनीचा
आकाशी झेप तर घ्यायचीच आहे ,
ठेंगणे होईल आकाशही,
मन तू खंबीर करायला शिक.
साठव मनी तो रोमांच,
त्या गोंदवलेल्या स्पर्शाचा
तृप्त होईल मनतृष्णाही,
तू धीर धरायला शिक.
Kiran
https://www.kadakmarathiukhane.inचांगली माहीती आहे आपल्या मराठी भाषा मध्ये
ReplyDelete