Monday, April 4, 2016

घडतं... बिघडतं !

कोणाला तरी कधी काळी दिलेली काही वचनं, आश्वासनं ..प्रॉमिसेस ... फार अंगावर येतात कधीकधी..कोणाला तरी कशाला, स्वतःच स्वतःला दिलेली प्रॉमिसेस तरी कुठे पाळली जातात नेहमी.. माझ्याकडून अनेकदा होतं असं. म्हणजे, मुद्दाम ठरवून असं नाही..पण शब्द फार सहज दिला जातो . संकल्प अगदी सहज सोडले जातातसंभाषणातल्या काही गोष्टी casually घेतल्या जातात माझ्याकडून . आणि मग एक अपेक्षाभंगाचं ओझं मानगुटीवर येउन बसतंयातून वाढत जाते असुरक्षितता ..नवी नवी कारणं शोधणं..आणि आपलं बरोबरच होतं, हे ठसवण्यासाठी, आपला आत्मविश्वासाचा कोटा शाबूत ठेवण्यासाठी इतरांच्या चुका काढत राहणं.
अर्थात आपल्यापैकी कित्येकांना आत्मविश्वासाचा बूस्टर डोस स्वतःला दिल्याशिवाय चैनच पडत नाही . माझी एक मैत्रीण आहे. कुठल्याही कार्यक्रमाला, पार्टीला कुठेही गेलो, तरी तिचं 'माझा नंबर पहिला' , हे चालूच असतं . म्हणजे प्रवेशच अशा तोऱ्यात करायचाकी आपल्या इतकं महत्त्वाचं आणि ग्रेट त्या ठिकाणी कोणी नाहीच जणू! आणि चुकून तिच्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्व दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय असं चुकून जरी लक्षात आलं, की मग तर संपलंचपुढचा संपूर्ण वेळ त्यातच खर्च! असो. विषयांतर झालं.
तर, या प्रॉमिसेस पायी किती तरी गोष्टी घडतात- बिघडतात..सहज सांधली गेली असती अशी नाती तुटतात. कित्येकदा क्षुल्लकच असतं.. आपल्या अपेक्षाही आणि समोरून येणारी कारणं ही .ती क्षुल्लक राहत नाहीत आपल्या हट्टामुळे.. कुठल्या तरी इगोजमुळे. या धडपडीत किती काय गमावतो का आपण..  केवढी तरी शक्ती आणि खूप सारा आनंद.. पुढे मग या सगळ्याचाच कंटाळा यायला लागतो  'माणसं चुकीची नसतात, ती फक्त एकमेकांपेक्षा वेगळी असतात,' हे लक्षात नाही राहत आपल्या .
नाती जपण्याचा अट्टाहास करत असताना थोडंसं दूर राहून त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्नच करत नाही आपण..एखाद्या तलावामध्ये, शांत पाण्यात एखादं कमळ त्याचं त्याचंच तरंगत असतं .पाणी ओढून नाही घेत त्याला आपल्या मध्ये. त्याचं रमणं पाहत रहातं दुरुनच.. दोघांनाही ठाऊक असतंच की एकमेकांमुळेच आपलं अस्तित्त्व आणखी सुंदर होतंय..पण ते लादण्याची, सिद्ध करण्याची गरज नाही लागत त्यांना.. कदाचित तेच प्रॉमिस असेल त्यांच्यातलं..त्यांना पाळायला जमलेलं! आपण हा आपल्याला जमणारा खेळ फक्त काठावरून बघत राहायचं.. आपण केलेली प्रॉमिसेस आठवत.

स्पृहा जोशी


8 comments:

  1. If I could swim through the ocean
    If I could see beyond the horizon
    I would climb the mountain
    I would reach the sky
    to discover myself in "me" ,
    in the chaos of expectations,
    may be in vain,may be in resentment .

    ReplyDelete
  2. Khup Chhan lihil ahe tai ...

    ReplyDelete
  3. Khup Chhan lihil ahe tai ...

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय,,, आणि खर बघायला गेला तर वर लिहिलेल्या situation मधून मी सध्या जातोय... ☺☺☺. खूप खरा आहे हे.

    ReplyDelete
  5. किती छान लिहीतेस तू, स्पृहा आणि किती सहज, कुठलाही 'आव' न आणता.असं वाटतं, अरे,असंच तर आपल्याला म्हणायचं होतं ! अशीच 'लिहिती' रहा !

    ReplyDelete
  6. स्पृहा अगदी सहज आणि स्पष्ट निरीक्षण नोंदवलस. आयुष्याचा रस्ता चालतांना, अनेक वळणे पार करतांना काही बाबींकडे नकळत डोळेझाक होते. कदाचित काहीवेळा दुर्लक्ष करतो आपण. अचानक कधीतरी तुझ्यासारखं कुणीतरी अशा लिखाणातून जाणिव करून देतं, काहीतरी राहिल्याची हुरहुर मनाशी सलते. तसच काहीसं आता मनात आलं. जाता जाता सहज जाणिव करून दिल्याबद्दल आभारी आहे!

    ReplyDelete
  7. आवडल अगदी मनापासून..जस काही माझ्या मनातलं..

    ReplyDelete