हे उमलत्या पाकळ्यांचे स्वप्न माझे
चिंब भिजल्या आठवांचे स्वप्न माझे..
चांदण्यांचा खेळ चाले शांत राती,
हासले पाहून त्यांना स्वप्न माझे..
आज येथे साद दे हळुवार कोणी
पाहते तो थांबलेले, स्वप्न माझे..
वाट माझी वेगळी ही शोधिली मी,
भेटले वाटेवरी अन स्वप्न माझे..
एकटी मी चालले वाटेवरी या,
आज माझ्या सोबतीला स्वप्न माझे..
-स्पृहा.
nice..really liked it...kharach asta asa.....
ReplyDeletenice 1
ReplyDeletewaah....!!!
ReplyDeleteKhup chaan aahe....
ReplyDeleteSwapn tuze...
spruha, khup sundar lihila ahes.......
ReplyDeleteनमस्कार,’रेषेवरची अक्षरे’ (http://reshakshare.blogspot.com/)या दिवाळी अंकासंदर्भात तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमचा ई-पत्ता मिळेल काय?
ReplyDelete-संपादक मंडळ, रेषेवरची अक्षरे (resh.akshare@gmail.com)
फारच छान...
ReplyDeletekhupach sundar mast :)
ReplyDeleteSPRUHA tu tuzya swapnanna khupach chhan shabdabaddha kel aahes,APRATIM!!!!!!!!!!!!
ReplyDeleteझाली पहाट
ReplyDeleteतरी धुके दाट
पहावी वाट
येण्याची तिच्या
आता वेशीवर
हृदयाची लक्तरं
कशाला लवकर
यावे तिने?
गेला गेला दिवस
आता एकच आस
संध्याकाळ उदास
होऊ नये
आली शुक्राची चांदणी
गंधाळली रातराणी
माझ्या विश्वाची राणी
आली की काय?
मनाचा पिसारा
अंगभर शहारा
तिला विचारा
काय करू?
- यशोधन
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमित्रांनो धन्यवाद..! आणि यशोधन कविता आवडली..मस्त आहे.
ReplyDelete१. काही तरी करण्याच्या नादात मी चुकून माझी कॉमेंट डिलीट केली :(
ReplyDelete२. आपल्या स्तुतीच्या प्रतिक्रियेसाठी माझ्या जवळ शब्द नाहीत.
१ + २ = मी बावळट आहे!
सुंदर कविता पण....
ReplyDeleteतुम्ही लेख खूप चं छान लिहिता
तुमच्या कडे लेखन कौशल्ये मस्त आहे.
sarvach chhan. vaachtana maja aali. thank u all.
ReplyDeleteyashodhan saheb, aapli kavita ekdam mast.
ReplyDeleteNiceeeeeeeee!!!!!!!!!!!!
ReplyDeleteEkdam kadak...!!!
ReplyDeleteItke sundar kase lihites tu? You have a GOD's gift. Keep it up!
ReplyDelete