बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
आसुसलेलं, थबकलेलं
बरंच काही.
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस
देऊन जातो..
apratim..khupach chhan!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chan kavita ....awadli aplyala
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekhooop chan tooo nic :)
ReplyDeleteThank you very much for resuming on the blog
ReplyDeleteमस्तच.....#Awesome......
ReplyDeleteमस्त!!!!!!!!!!
ReplyDeleteछान जमलंय मुक्तक!
ReplyDeletekharach khup kahi deun jaato paus algad aaplya mutith!!!
ReplyDeletekharach khup kahi deun jaato paus algad aaplya mutith!!!
ReplyDeleteSundar..:-)
ReplyDeleteChan kavita!!!
ReplyDeleteखूप छान उन्हात पण पाऊसात घेऊन गेलात ....:)
ReplyDeleteपाऊस अश्रू ना हि लपवनारे
ReplyDeleteपाऊस अश्रू ना हि लपवनारे
ReplyDeleteनमस्कार
ReplyDeleteतुझ्याशी संवाद साधता आला ही आनंदाची गोष्ट आहे
आरवलीच्या लघाटे व परशुरामच्या येथील कुटुंबांच्या मुळे आम्ही तूझी प्रगती अनुभवतो आहोत। दीक्षित जोशी लघाटे अशी विविध ठिकाणाहून तुला मिळणाऱ्या अनुभवातून तू तुझं जीवन समृद्ध करीत आहेस हे पाहून खूप आनंद होतो. तू कधी वाचशील हा निरोप माहीत नाही पण चंदेरी दुनियेत तू स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे कष्ट घेते आहेस त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। नात के आहे आपलं पेक्षा। आपण आपल्या माणसांचं कौतुक केल्याने त्यांचा उत्साह वाढतो। हे माहीत आहे मला।
विद्या आशा माधुरी या सर्व ताई म्हह्णजे माझ्या सासऱ्यांच्या मित्राच्या मुली। माननीय मोरूभाऊ पाटणकर व माझे सासरे पंढरीनाथ वासुदेव पाटणकर ।। तुझी आजी ( बाबांची आई )माझी नणंद आहे। । पण इतकी सर्व छान माणसं मिळणं हे प्रत्येकाच भाग्य असत.
मी खूप लिहिलं असलं तरी हे सर्व खूप दिवस मनात होत तुझं कौतुक करावे ।। तुमचं लग्न आम्ही दोन्ही कडून येऊन अनुभवलं । खूप सुंदर आयुष्य आहे.
तुझ्या सर्व उत्तम आशा आकांशा पूर्ण होऊदेत हीच परमेश्वराकडे प्रार्थना।
प्राची आणि उमेश पाटणकर पुणे म्हणून पंढरी तात्या व मामा आशा नावाने दोन्ही कुटुंबाकडे आमच्या कुटुंबाची ओळख आहे।
ReplyDelete