लहानपणापासून शिकवलं गेलंय,
"सुखानंतर दु:ख्ख येतं, आणि दु:ख्खानंतर सुख."
आपण सतत सुखाच्याच शोधात.
त्यामुळे झालंय असं,
दु:ख्खापासून दूर पळताना
नकळत सुखापासूनच
लांब पळत राहतो आपण.
चक्र विसरतो.
नियम मोडू पाहतो.
आरंभ बिंदूपासून सुरुवात करून
एक सरळ रेषा तयार करू पाहतो,
वर्तुळ मोडून!
आणि मग हे असं निरर्थक धावताना
इतके भेकड बनत जातो,
की येणाऱ्या सुखाचीच
भीती वाटायला लागते.
सुखाच्या शोधात असताना
ते सुखच नकोसं वाटायला लागतं.
कारण आपल्या भित्र्या डोक्यात एकच..
"सुखानंतर दु:ख्ख येतं"
वाक्याचा उरलेला अर्धा भाग..??
"आणि दु:ख्खानंतर सुख."
विसरूनच जातो आपण सोयीस्करपणे.
काळोखातल्या पाकोळीसारखी, अविरत
फडफड चालूच राहते.
अखेर दमलेल्या मनाला दु:ख्ख तर सोडाच,
सुखही सोसवत नाही..
सगळंच केविलवाणं..!!
- स्पृहा.
waaaa.....
ReplyDeletekhupch chan :)Best Wishes :)
ReplyDeletechan!
ReplyDeletehummm palat raahaato aapan swatapsun vicharanpasun aani sagalyaach pasun kaaran bhiti ,,,,,,
ReplyDeletekiti chhan mandalayas ga sukhachi bhiti ........
v nice spruha :)
ReplyDeleteawesome! :-)
ReplyDeleteसुख दुख्ख हे चालतच राहतं... प्रत्येक क्षण ख़ुशीने आणि पूर्णपने जगत राहायचं......उद्याची काळजी करून आजचा सुखाचा क्षण का सोडावं :)
ReplyDeletekhupch sundar.........
ReplyDeletemastach!!!!!
ReplyDeleteSubodh,Reshma,Akshta,Reshma Aapte,Prashant,Saurabh,Anand,Priti and Rushikesh..Thank u so much Mitranno!!:-)
ReplyDeletekhup sundar....
ReplyDeletehe mazyabarobar pan hotay...
ReplyDeleteBhari...!!
ReplyDeleteI have been a fan of your work as an actor and now I am a fan of your crisp and fluid writing.. You are a true artist.. keep up the good work..
ReplyDeleteRegards,
Ketki Phanse
M ur fan ketki
Deleteमस्त… सुंदर… अप्रतिम !
ReplyDeleteअलगद आणि अप्रतिम
ReplyDeleteअलगद आणि अप्रतिम
ReplyDelete