हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सर्वात जुना समजला जाणारा प्रकार म्हणजे 'धृपद'.सम्राट अकबराचं चरित्र लिहिणारा अबुल फझल 'ऐन-ए-अकबरी' मध्ये म्हणतो,"चार ओळींचा धार्मिक,प्रेममय,ईश्वराशी नाते सांगणारा संगीताविष्कार, म्हणजे 'धृपद'." कलाप्रेमी मुघलांच्या दरबारात धृपद गायकीला मानाचं स्थान होतं.संगीत शिरोमणी तानसेनाचे गुरु स्वामी हरिदास 'धृपद' गायकीचे प्रमुख उद्गाता होते.
१८ व्या शतकानंतर मात्र जशी ख्याल गायकी बहरू लागली,तशी 'धृपद'गायकीची लोकप्रियता ओसरू लागली.सरोद आणि सतार यांसारख्या माधुर्यपूर्ण वाद्यांचा याच काळात शोध लागला.धृपदाच्या हळुवार गायकीला या वाद्यांची द्रुत साथ शोभून दिसेनाशी झाली.आणि मागे उरली ती एका श्रीमंत काळाची आठवण...आणि धृपद गायकीचा राजेशाही थाट..!!
Khup sundar lihilayas!!!!!!!! All the best
ReplyDeletethanx Radhika..
ReplyDeleteतुझी पहिली ब्लॉग पोस्ट... सुंदर ! ^_^
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलयंस स्पृहा... मी तुझी नेहमीची वाचक आहे... पण हे वाचून इथे कमेंट द्यायला नाही रोखू शकले... कारण तू धृपद बद्दल लिहिलंस... खूप छन वाटलं... मला वाटतं यापुढे अजून काहीही बोलण्याचे गरज नाहीये... खरंच अप्रतिम !
ReplyDelete