फूल हसते जे आज,उद्या कोमेजून जाई;
हवेसे वाटते सारे,खुणावे,विरून जाई..!
फुलाच्या कोमेजण्याचे नाही कोणा दुःख फार,
शोध सत्वरी नव्याचा जुने ते भुईला भार!
चमकून जाई वीज,क्षणाचाच खेळ सारा;
कसानुसा हो अंधार,पाहता असा नखरा.
आयुष्याचे झाले आहे आमुच्या असे नाटक,
विकतची सुखे सारी,'खरेपणा' हे पातक.
क्षणभंगुर पावित्र्य,बाजारात मिळे प्रेम;
पैसा झाके पापे सारी,आणि मुखे हरीनाम!
गाव जुने ते आनंदीअसे कसे बिघडले,
चंदेरी या प्रकाशात पणतीला विसरले!
पणती ही विझली अन,जीव होई कासावीस;
बेगडी हसतो तरी,मन उदास,उदास!
वाट तुडवीत तरी आम्ही चालतोच आहे,
आनंदाचे गाव जुने आम्ही शोधतोच आहे.
निळ्या शांत आकाशात जिथे चांदण्यांची वृष्टी,
नव्या दिवसाला जिथे हसरी,साजरी सृष्टी.
आईच्या कुशीत जिथे नीज दुलई पांघरे,
आणि डोळ्यांत दाटती आनंदाचे आसू खरे!
तेच आनंदाचे गाव पुन्हा कधी सापडेल,
श्वास मोकळ्या वाऱ्यात पुन्हा मन थरारेल..!!
-स्पृहा.
क्या बात!! क्या बात!! क्या बात !!
ReplyDeleteअप्रतिम स्पृहा!!!!!
apratim..surekh
ReplyDeleteaanadache gaav kadhitari he sapadel
ReplyDeleterasta jari kaccha tari marga nakki milel
Khup chan...sunder
ReplyDelete