मला 'नाही' म्हणायला शिकायचंय..
आर्जवी शब्दांना,
खेळकर मागण्यांना ,
पसरलेल्या अगतिक हातांना,
डोळ्यातल्या पाण्याला.
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
वाऱ्याच्या वेगाला
झऱ्याच्या नादाला,
पाखरांच्या गाण्याला
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
आपल्यांच्या मनाला
मनातल्या आपल्यांना
आतल्या आवाजाला,
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
हल्ली हे असंच वागावं लागतं,
त्याशिवाय चालतच नाही..
मी कधीपासून खूप प्रयत्न करतेय.
खरं सांगते..जमतच नाही !!
-स्पृहा.
खूपच सुंदर.
ReplyDeleteKeep it up!
correct ,malasuddha spashtapane NAHI mhanta yet nahi.
ReplyDeleteEkdam Khara ahe.... hyashivay jagna mushkil ahe... Loka apla phayda ghetat...
ReplyDeleteUmesh,Parth,Prasad
ReplyDeleteमला 'नाही' म्हणायला शिकायचंय..
Deleteआर्जवी शब्दांना,
खेळकर मागण्यांना ,
पसरलेल्या अगतिक हातांना,
डोळ्यातल्या पाण्याला.
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
agadi barobar vatala... perfect.... he kharach jamayala hava.....
वाऱ्याच्या वेगाला
ReplyDeleteझऱ्याच्या नादाला,
पाखरांच्या गाण्याला
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
he matra manala nahi patat.....
nisargatil ya sahajatela, tya niragas goshtinna nahi mhanayala kavayitri ka sangat aahe kalat nahi....
Tumchi dusri post - Sundar kavita, pratyekachya manatla vichar eka kavitet pranjalpane mandala ahes....mala suddha nahi mhanta yet nahi pn te vyavaharat ekhadi kavita karal mazhyasathi... ek vinanti.
ReplyDelete