२१ व्या शतकाचं पहिलं दशक बघता बघता संपलं. एखाद्या अल्बमचं पान उलटावं तसं. किती काय काय पाहिलं या दशकाने..हिंसा,विध्वंस,सूड,वेदना,विखार,अराजक...आमची अक्खी पिढी या असुरक्षित वतावरणात वाढली.भोवती आपल्यांच्या हातांचं कवच आहे अशा आभासी वातारणात...रोजच्या धबडग्यात,स्पर्धेत पळताना जगात काय चालू आहे याचा विचारच केला नव्हता.आज पहिल्यांदा शांतपणे अशांत सभोवताल उघड्या डोळ्यांनी पाहतेय..
सुरुवातच झाली २००१ सालच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याने.. माथेफिरू मूलतत्त्ववाद्यांनी एका महासत्तेला उघड उघड दिलेलं आव्हान. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर लादलेलं युद्ध..अगणित निरपराधी नागरिकांचं उध्वस्त झालेलं आयुष्य..भावजीवन..ही सुलतानी कमी म्हणून की काय देवाने धडलेली अस्मानी...२००४ साल आशिया मध्ये त्सुनामीचा कधीच न जाणारा ओरखडा ठेऊन गेलं..त्याच्यामागोमाग २००५ मध्ये अमेरिकेत कतरिना हरिकेन ने उत्पात केला..
२००८ साली change has come..म्हणत बराक ओबामांनी इतिहास घडवला..तेव्हा जरा कुठे मानवी समाज इतिहास नवं वळण घेतो आहे,असा वाटत होतं..हे वर्ष जरा शांततेत जातंय अशी वेडी आशा जागते न जागते तोच अतिरेकी हल्ल्यांनी २६ नोव्हेंबर ला मुंबई थरारली! स्तब्ध झाली... २०१० ची सुरुवातच हैती बेटावरच्या अभूतपूर्व भूकंपाने झाली.. अर्थशास्त्रीय भूकंप तर वेगळेच!!हे सगळे तर फक्त लहानसे तुकडे आहेत विध्वंसाच्या गच्च भरलेल्या पटाचे...अशा कित्येक घटना,प्रसंग..माणुसकीला रडवणारे..मनांवर कायमचे ओरखडे ठेऊन जाणारे...
नव्या दशकाच्या पूर्वसंध्येला त्या वरच्या खेळीयाला एकच विनंती आहे...बाबा रे, आमच्या कुंडलीत तू काय लिहितो आहेस,माहित नाही;पण कमीत कमी आमचं माणूसपण टिकवून ठेवून ते सोसायची शक्ती तरी आम्हाला देच...तुझ्या ह्या खेळात निदान एवढं दान तरी आमच्या पदरात टाक !!
खरं आहे! ह्या दशकात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जग कितीतरी पटीने जवळ आले आहे (सोशल नेटवर्किंग), पण त्याच बरोबर त्याच तंत्रज्ञानाने किती तरी जीव देखील घेतले (दहशतवाद)! आपण विज्ञानाच्या क्षेत्रात कितीतरी प्रगती केली आहे पण माणूस म्हणून नक्कीच कुठे तरी आत्मपरीक्षणाची गरज आहे, आपली प्रगती नेमक्या कुठल्या दिशेने होत आहे हे क्षणभर थांबून तपासायला हवे. खरोखर देवा आमच्यातल माणूसपण टिकवून ठेव!!!
ReplyDeleteआणि स्पृहा तू तर अख्खं दाशाकच डोळ्यासमोर उभं केलंस!!!
Sahi lihila aahes. Ekdam barobar.
ReplyDeleteछान!
ReplyDeletethis is just begining of 21st century "balache pay palnyatach dislet"
ReplyDeleteEvery time one looks back, it appear has previous decade was better. praying for the coming decade to be better. Mumbai suffer 26/11, middle-east continue to suffer during last decade. Brave are Mumbaikar who knows they are easy to pray but continue to LIVE good and happy life with their Dear Ones.
ReplyDeleteNine years back story, but well written and in current context still holds so true....
= Ankush Gawade