Sunday, June 5, 2011

पहिला पाऊस

निसर्गाचेही 'मूड्स' असतात..!!??
दुपारपर्यंत सारखं मळभ येत होतं,जात होतं..
अगदी कोमेजून गेला होता तो..
त्याचा घसा दाटून येत होता,
वाटायचं, आत्ता कोणत्याही क्षणी
रडूच फुटेल त्याला..
आता मात्र लहान बाळासारखा
हसतोय..नाटकी!!
मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता,
आज पहिला पाऊस येणारे!!!
....माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला.
मोगरा कोमेजला होता इतके दिवस..
आज खदखदून हसला!
कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती,
सोनेरी संधीप्रकाशात भिजलेली वाटत होती.
वळचणीची पांढरी कबुतरं एरवी नको करतात अगदी.
आज त्यांच्या भिजल्या पंखाची थरथर
 पाहतच बसले मी,एकटक.
झाडं मोहरली,वेली बावरल्या,
थंड हवेची झुळूक, मातीचं महागडं अत्तर
खुळ्यासारखं जगभर उधळून गेली!
 थोडासा गारवा, हलकी शिरशिरी..
कात टाकली आसमंताने अलगद...
आकाशात अचानक वेगळेच रंग आले.
पाण्याला रंग नसतो खरंतर;
पण पावसाला मात्र असतो
काय गंमत आहे नाही??
हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग..
तो वेड लावतो, आणि आपणही वेडे होतो..
 रिमझिमत्या सरी आठवणी होऊन
वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,
लगेच कविताच सुचायला लागतात..!!!

- स्पृहा.

17 comments:

  1. सुंदर.. आवडली.. :-)

    ReplyDelete
  2. apratim
    punha ekada tya pahilyaa saricha sparsh zaalyaasarakhe vaatale ,... angavar shirshiri aali :)
    sundarach :)

    ReplyDelete
  3. Pahila paus...........aani tya maticha sugandh......agadich mohun takato......

    Nice

    ReplyDelete
  4. मस्तच ...

    पाण्याला रंग नसतो खरंतर;
    पण पावसाला मात्र असतो
    काय गंमत आहे नाही?? :)

    ReplyDelete
  5. Dhanyavaad mitraho..HaPpY MoNsOoN!!!

    ReplyDelete
  6. पहिला पाऊस --झाडं मोहरली,वेली बावरल्या,
    थंड हवेची झुळूक मातीचं महागडं अत्तर ....
    आवडली आवडली

    ReplyDelete
  7. पहिला पाऊस एकदम झकास......खुप सुंदर वर्णन केलस..... :)

    ReplyDelete
  8. Phila paus sparshun gela...........

    ReplyDelete
  9. पाण्याला रंग नसतो खरंतर;
    पण पावसाला मात्र असतो
    khupach sundar lekh...

    पावसामध्ये हरवलेलं मन आणि मनामध्ये हरवलेला पाऊस..........
    ................. यांचा थांग कधीच लागत नाही म्हणा ....

    ReplyDelete
  10. hello Spruha,

    Bara vatala ha blog join karun. kharach lekh ani kavita khup chan ahet.

    ReplyDelete
  11. kya baat!!! btw Gulabi Thandi kinva nusatich Thandi ha ek changla vishay asu shakto kavitesathi, nai ka!

    ReplyDelete
  12. ....माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला.
    मोगरा कोमेजला होता इतके दिवस..
    आज खदखदून हसला!

    कसलं भारी लिहितेस तू स्पृहा....
    एकदम मस्त !!!

    ReplyDelete
  13. खूप सुंदर ताई.... कोणी तरी म्हटले आहे...."जीवन वादळ संपण्याची वाट पाहणे नाहीये....तर आनंदाने पावसात नाचायला शिकणे आहे.."

    ReplyDelete