Friday, June 10, 2011

वेडा फकीर!

आटपाट नगर होतं..
त्या नगरात सगळेजण सुखा समाधानानेगुण्यागोविंदाने नांदत होते. 
एक दिवस फिरत फिरत एक वेडा फकीर आला त्या नगरात..
देवानेच पाठवल्यासारखा..
हातामध्ये कुंचला आणि डोळ्यांमध्ये गूढ काहीतरी शोधणारे वेगळेच रंग.. 
पाहता पाहता या नगरीच्या  प्रेमात पडला तो..
रेषांना वेगळीच लय आली..रंगांना वेगळाच पोत मिळाला..
अवकाशाला नवीन भान मिळालं..
आत्मानंदामध्ये मग्न होता फकीर.. 
सृजनाचे नवे नवे अविष्कार घडवत होता. 
कलेला एक नवीन परिमाण देऊ पाहत होता..
ठरलेल्या साच्यातून बाहेर काढू पाहत होता..
एक दिवस मात्र आक्रीत घडलं..
देव- देवतांचं  भारी प्रेम त्या नगरीला..
गीता- कुराणाचंही.
नाविन्याचा शोध घेताना
देवदेवतांची नग्न प्रतीकं..??!!
अब्रह्मण्यम!!
समजाचा आरसा असलेल्या चित्रपटात 
कुराणातील कवनं..??
या अल्ला!!!
घोर अपराध केला होता त्या फकिराने..
या असल्या संवेदनशील मनाची 
नगरीच्या लोकशाहीला गरज नव्हती..!! 
'विकृत चाळेम्हणून धिक्कारलं त्याला,
त्याच्या कलेला धर्ममार्तंडांनी, मुल्लामौलवींनी..
परागंदा व्हावं लागलं त्याला,
त्याच्या लाडक्या भूमीपासून..
तरीही चित्र रंगवत राहिला तो..एकटाच.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जपत राहिला..
त्याच्या सृजनाच्या कल्पना
इतिहासाच्या   कॅनव्हासवर कायमच्या कोरल्या गेल्या.
आज तो वेडा चित्रकार नाही आपल्यात..शरीराने..
पण त्याच्या प्रत्येक चित्रातून,रंगांतून
त्याचा आत्मा हसून बघत राहतो..स्वतंत्र!
त्याच्यासारखाच अजून कोणी
वेडा फकीर आहे का,
हे शोधत राहतो...!!!

- स्पृहा.

8 comments:

 1. पूर्णतः असहमत. ही एकच बाजू मांडलीत तुम्ही. त्याची ताटल्या त्यात बरी चित्रं दिलीत इथे पण ज्या चित्रांवरून वाद उद्भवले ती चित्रं नाही दिलीत.. का बरं? कारण ती आक्षेपार्ह वाटतात म्हणूनच ना?

  ती सगळी चित्रं इथे बघा. http://goo.gl/Ihpiq

  ReplyDelete
 2. ha purnatah personal mudda asu shakto heramb..He maza mat ahe..Tumcha mat mazyahun vegla asu shakta..mala manya ahe.

  ReplyDelete
 3. स्पृहा, सहमत. मी तुमचं मत चुकीचं आहे असं म्हंटलं नाहीये. मी असहमत आहे एवढंच म्हटलंय. गैरसमज नसावा.

  ReplyDelete
 4. एखाद्या कलाकाराचे विचार लोकांना मान्य नसतात किंवा ते चुकीच्या पद्धतीने मांडले गेले तर कलाकाराची बदनामी होते. बहुतेकदा त्यातला अर्थ, हेतू कळण्या इतकी समज नसलेलेच लोक त्यांच्यावर टीका करतात आणि हा त्यांचा मूर्खपणा असू शकतो. त्या कलाकारास आपली कलेची सेवा ही या सगळ्याहून कैक महत्त्वाची वाटते.

  ReplyDelete
 5. indeed sundar likhaan ,,,
  aani kas aahe na shevati kalaa mahatwachi ,,, mazya mate kalaa he vakt honyaache madhyam aahe ,, aani vyakt hone hi ptatyekaji garaj aani aadhikar aahe ,, m party agreed wid u spruha

  ReplyDelete
 6. Heramb,Sagar ani reshma..Dhanyavaad!:-)

  ReplyDelete
 7. या लफंग्याने मुसलमानानी आक्षेप घेतल्यावर आपला एक सिनेमा प्रदर्शित केला नाही.

  ReplyDelete