Tuesday, December 21, 2010

'टेस्ट' पलीकडे..

  एक छोटासा,साधासा मुलगा...आपल्या 'कोच'च्या नजरेला नजर न भिडवता,हळुवार आवाजात बोलणारा..विनोद कांबळी नावाच्या जिवलगा बरोबर ६६४ धावांची रेकॉर्ड ब्रेकिंग  पार्टनरशिप करणारा..एका वर्षातच,म्हणजे १९८९ साली त्याने 'टेस्ट' क्रिकेट मध्ये भारताच्या टीमकडून पदार्पण केलं,तेच इम्रान खान, वासिम अक्रम अशा दिग्गजांच्या 'कसोटी'ला उतरत..वर्षांमागून वर्ष सरली,भल्याभल्यांची  हौस विरली..पण तो मुलगा खेळतच राहिला..सचिन तेंडुलकर नावाचा एक सरळ साधा मुलगा,जिवंतपणी दंतकथा बनून उरला...
   आज माझ्या वयाइतकी वर्ष तो क्रिकेट खेळायला लागून झालीयेत..तीच ऊर्जा,तसाच उत्साह...कुठून येतो खरंच..!! आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे हे.. २१  वर्षानंतर आज तो ध्रुवा सारखं अढळ स्थान घेऊन बसलाय..कसोटी क्रिकेट मधल्या ५० व्या शतकानंतर त्याच्या स्कोर च्या आसपास कोणीही खेळाडू पुढली कित्येक वर्ष तरी पोहोचू शकणार नाहीत,हे सत्य आहे.. त्याला वयाचे दाखले देऊन,काळाच्या चौकटी मध्ये अडकवून रिटायर होण्याचे अनाहूत सल्ले   देणाऱ्या सर्वांनाच तो पुरून उरलाय..अगदी सर्वशक्तीमान काळालाही..!!
   भारतातल्या प्रत्येकाला सचिनची अचिव्हमेंट स्वतःची वाटते..आणि त्याचं अपयश सुद्धा.. ते त्याच्यावर आशीर्वादांची खैरातही करतात.. आऊट झाल्यावर त्याला शिव्याशापांची लाखोलीही वाहतात.. कारण तो 'त्यांचा' असतो..कृष्णाला नाही का..लंगडा,चोर काहीही म्हणतो आपण..इतकी जवळीक त्याच्यावरच्या प्रेमाने साधलेली असते..तसंच हे.. एक अब्ज लोकांना या एकाच माणसाकडे काहीतरी दैवी शक्ती आहे,असा ठाम विश्वास आहे...तो काहीही चमत्कार करू शकतो अशी श्रद्धा आहे.. रोजच्या धावपळीच्या,अनागोंदीच्या,आला दिवस निमूटपणे ढकलण्याच्या पराभूत भारतीय मानसिकतेला  त्याचं फील्ड वर असणं हेच प्रतीक आहे..'विजया'चं प्रतीक! आणि त्यामुळेच कदाचित सचिन तेंडुलकर ही व्यक्ती कुठल्याही 'टेस्ट' च्या पलीकडे आहे..!!! Long live Sachin!!!

18 comments:

  1. khup chan spruha ! mala tuze blogs vachayla aavadtil..updates det raha !! tc :)

    ReplyDelete
  2. १६ नोव्हेंबर १९८९ ..... कराचीत पीचवरती एक १६ वर्षांचा एक मुलगा उतरला .... त्यानंतर नॉन स्ट्रायकर एन्ड वरचे सगळे सगळे बदलले पण सचिन अजून खेळतोच आहे. :-)

    सचिनद्वेष्ट्यांना एक मोफतचा सल्ला - "सचिनद्वेष्ट्यांनी सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!"

    क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे आणि सचिन हा देव! सचिन पीचवर असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक फटक्यावर १०० करोड हृदये आंदोलने घेत असतात. तो नव्व्याणव वर असताना तेहतीस कोटि देव पाण्यात ठेवलेले असतात, लाखो ओंजळी त्याच्याकरता "दुआ" मागत असतात. त्याचे प्रत्येक शतक - बॉम्बस्फोटाने जखमी झालेल्या, महागाईने पिचलेल्या, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या आमच्या मनावर तात्पुरती का होईना फुंकर घालते. आणि त्याबदल्यात आम्हि त्याला फक्त "थॅंक्स" देऊ शकतो.

    सचिन आपल्या सगळ्यांना असेच न थकता अजून नविन लिहायला लावत राहो हिच सदिच्छा!!

    ReplyDelete
  3. aiiiyeeeeeee shappppppat ek number
    khupch bhari lihil tai tu he far avadla ahh aplyala

    ReplyDelete
  4. वाह स्पृहा वाह...एकदम छान लिहिले आहेस..!!!

    ReplyDelete
  5. we all are priviliged to have lived in era of THE GREAT SACHIN TENDULKAR!!

    ReplyDelete
  6. icc has declared 24 april as "world cricket day"..
    i.e. birthdate of sachin...i think dis is tyhe greatest achievement of "being sachin"...

    ReplyDelete
  7. I agree wid u SPRUHA...!!! Sachin.. aaj retire zala ani asankhya bhartiyanchya dolyat paani ala.. mi tar mhanen kitihi paashaan hrudayi manus aajchya divashi sanyam theuch shaknar nahi.. ani jar thevla tar to manusch nahi.. feeling really sad n lonely.. SACHIN tu maidanant nasshil tar amhi maidanat kay baghaycha he fact sang.. ithun pudhe bharatache anek cricketer yetil ani kheltil pan tuzi jaga kunihi gheu shaknar nahi.. tu cricket cha DHRUVA TARA ahes.. Hats off to U GOD.. We really love u n we will MISS U forever...!!!!

    ReplyDelete
  8. आज विकिपीडियावर
    " Sachin Ramesh Tendulkar (Listeni/səˈtʃɪn tɛnˈduːlkər/; born 24 April 1973) is a former Indian cricketer widely acknowledged as one of the greatest batsman of All time."
    हे एक वाक्य सांगून जाते खरंच क्रिकेटचे एक सुंदर युग संपले

    ReplyDelete
  9. apratim.... Prtyekachya manatla Sachin shabdani rekhatlais tu ethay....

    ReplyDelete
  10. Nice article Spruha,
    Mazya sachin varchya kavitetlya 2 lines-
    'Idol of idols mhnje apla Tendulkar,
    Achrekarani pailu padlela Bharatratna Tendulkar.'

    ReplyDelete
  11. Spruha ...U r Simply great.. Keep Writing and it energises all of us.

    ReplyDelete
  12. अप्रतिम स्पृहा दी

    ReplyDelete
  13. 1 number ...
    sachin best fan ever seen

    ReplyDelete