Wednesday, December 29, 2010

शीला की जवानी..!!

धुमाकूळ... धुमाकूळ घातलाय या गाण्याने... ट्रेन, बस, नाका, कट्टा, कॅन्टीन, रेडिओ, जिथे पहावं तिथे हाच गजर आहे... मुलं-बिलं तर सोडाच. पण लहानात लहान चिमुरडी पासून पन्नाशीच्या प्रौढे पर्यंत 'शीला' सगळ्यांच्या तोंडात जाऊन बसली आहे.. (अर्थात, मुलं-बाळ समोर असताना "Im just sexy for you" या ओळीच्या जागी "ना ना ना ना.." होऊन आया-बायांनी स्वतंत्र व्हर्जन केलं आहे!!) तिच्या 'जवानी' चं कौतुक ओसंडून वाहतंय.. हे गाणं काय रिलीज झालं आणि साध्याभोळ्या शीला ची एकदम फटाकडी फुलबाजी झाली !!
हे गाणं लोकांना 'थोडंथोडकं' नाही तर "भयंकर" आवडलंय. आणि त्या "भयंकर" आवडणाऱ्यांमध्ये माझाही नंबर आहेच! विशाल-शेखरचं पावलं थिरकवायला लावणारं धमाल संगीत, कॅची, तोंडात बसणारे शब्द, सुनिधीचा 'कडक' आवाज, कतरीनाचा 'घायाळ' डान्स हे तर त्याचं कारण आहेच. त्याबद्दल संगीतकार, गायिका, अभिनेत्री, कोरीओग्राफर या सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स. त्यांच्या या बेफाट 'निर्मितीला', 'creation' ला मनापासून Hats off!!
पण त्याहीपलीकडे मला जाणवलेली गोष्ट म्हणजे..हे सेलिब्रेशनचं गाणं आहे..स्त्रीत्वाच्या, Womanhood च्या सेलिब्रेशनचं.. कदाचित काहीजण मला वेड्यातही काढतील. (त्यांच्या लेखी हे गाणं अश्लील असू शकतं; या गाण्यातून 'स्त्री'ची अवहेलना केली आहे, असंही त्यांना वाटू शकतं!) पण मला तरी हे सेलिब्रेशन खूप मस्त वाटलंय.किती आत्मविश्वास आहे 'शीला'कडे.स्वतःच्या सौंदर्याबद्दल, शरीराबद्दल अभिमान आहे तिला! आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याचं धाडसही. त्यासाठी तिला 'पुरुष' लागत नाही.सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःवर प्रेम करतेय..!!! किती सुंदर आहे ही कल्पना..सतत कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या, 'त्याचं' मन राखण्यासाठी आयुष्यभर स्वतःचं मन मारणाऱ्या बायकांना 'शीला'चा हा बिनधास्त मोकळेपणा नवा, तरी हवासा आहे.कदाचित म्हणूनच 'शीला' एक प्रातिनिधिक चित्र बनली आहे.स्त्रीत्वाच्या,Womanhood च्या सेलिब्रेशनचं..

15 comments:

 1. हं, woman's day चं थीम सॉंग बनवा! :-D

  ReplyDelete
 2. एक चांगला वेगळा प्रयत्न आहे "शीला की जवानी" या गाण्याकडे पाहण्याचा..पण याच दृष्टीने विचार केला तर मग "मुन्नीचे" चे काय..?? शेवटी item songs ती item songs च..!!!!

  ReplyDelete
 3. @ Amol, अरे मुन्नीचं गाणं म्हणजे वर म्हणाली तसं - "सतत कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या,'त्याचं' मन राखण्यासाठी आयुष्यभर स्वतःचं मन मारणाऱ्या बायकांच" गाणं होईल. दुसर्‍यासाठी बदनाम होतात बिचार्‍या. :-D :-p

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. karamnukichya abhirup swarupana itke gahan arth dilet tyabaddal aabhari,social engg. chaan jamli

  ReplyDelete
 6. asaaa sudhaa drushtikon asu sahakato !! .. pudhachya veli rasik he gaana kahitari vegalya arthane aiktil aani vegalya arthane ghetil sudhaa!! :D

  ReplyDelete
 7. "स्त्रीत्वाच्या,Womanhood च्या सेलिब्रेशनचं.."

  एक वेगळा दृष्टिकोन म्हणून ठिक पण तेवढ्यावरून गाणं लिजंडरी वगैरे होऊ शकत नाही.
  संगीत वगैरे बरंय. पण कतरीनात "तो" ऍटिट्यूड नाहीच...

  ReplyDelete
 8. Hi Spruha!
  I never thought this way!
  Thanks for giving another perspective to it!
  :)

  ReplyDelete
 9. शेवटचा मुद्दा आवडला. "सतत कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या,'त्याचं' मन राखण्यासाठी आयुष्यभर स्वतःचं मन मारणाऱ्या बायकांना 'शीला'चा हा बिनधास्त मोकळेपणा नवा,तरी हवासा आहे." अगदी खर आहे हे हा मोकळेपणा पुरुषांना आवडणार नाही पण दुसऱ्याच मन राखण्यासाठी स्वत: मन मारण्यात काहीच अर्थ नसतो. आणि प्रत्येक वेळी स्त्रीनेच का? हा ही प्रश्न आहेच. बाकी छान लिहिलंस.

  ReplyDelete
 10. अप्रतिम लेख...
  तुमच्या प्रोफाईलमधील जवळपास सगळे चित्रपट माझेही आवडते आहेत...
  म्हणून तुमचा ब्लॉग जॉईन केला...

  ReplyDelete
 11. too good....mansane prathamatha aplywar prem karawe..ani natar bakichyanwar...

  ReplyDelete
 12. Author liked so no comments :-)))

  Sunidhi Chauhan voice modulation ensure it doesn't get categorized as vulgur, giving many shades of High and Low pitch. Not expert to say more on music/song , its limited knowledge :-))))

  What is important for India is to progress like Europe-US for good cause of Women not just within Cities, but even deep regional areas, keep sanity of religion but not bound with it forcibly..

  -Ankush Gawade

  ReplyDelete