Monday, January 3, 2011

एका लग्नाची गोष्ट..

    नाही,नाही..मी खूप गाजलेल्या त्या नाटकाबद्दल बोलत नाहीये...काही दिवसांपूर्वी एक वेगळीच गोष्ट वाचनात आली..ह्युग हेफनर (Hugh Hefner) नावाच्या अब्जाधीशाने त्याची नात शोभेल अशा क्रिस्टल हार्रीस (Crystal Harris)नावाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली..(लग्न नातवासोबत नव्हे..त्याच्यासोबत करण्यासाठी..!!) त्यामुळे त्याच्यावर टीकेची राळ उठली आहे.आणि लोक तोंडाला येईल ते बडबडताहेत. म्हणजे हे लग्न मुळातच कसं चुकीचं आहे..हा प्रकार किती भयंकर आहे वगैरे वगैरे!!बरं,या टीकाकार बोल बच्चनांपैकी कुणीच नवपरिणीत जोडपं खूष आहे का,त्यांचं आपसात बरं चाललंय का..अशा 'निरर्थक' गोष्टींवर विचार करण्याची तसदी घेतलेली नाही..बरं मुळात हे दोघं सज्ञान आहेत;आणि लग्न करायचं,नाही करायचं, कसं करायचं,कुणाशी करायचं हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.  किती विचित्र आहे नं.. एकाचवेळी जे जग आपल्या व्यक्तीस्वातंत्र्य,निर्णयस्वातंत्र्य यांचा डांगोरा पिटत असतं,ते अचानक किती कुचाळक्या करणारं,कुजकट बनतं.
    यावर 'स्वतंत्र 'पणे विचार करावासा वाटतोय मला.. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर हे योग्य;ते अयोग्य असा शिक्का मारणाऱ्या सर्वांपासून बाजूला होऊन...खरंच  हेफनर आणि क्रिस्टलने जे केलं,त्यावर टीका व्हायला हवी होती? प्रत्येक धर्मामध्ये स्वतंत्रपणे विकसित होत गेलेलं 'लग्न' नावाचं एक बंधन. माणसाच्या सांस्कृतिकतेचं प्रतिक. व्यक्तिस्वातंत्र्याच्या रेट्यात पुसट होत चाललेलं..मग अशात या दोघांनी लग्नबंधनावर,एकमेकांवर जो विश्वास दाखवला; कमिटमेंटची जी तयारी दाखवली,त्याबद्दल त्यांचं कौतुक व्हयला हवं!!!हां...चर्चा लग्नाला घेऊन  नाही...त्यांच्या वयातल्या प्रचंड फरकाबद्दल  असू शकते..पण "प्रेम आंधळं असतं" हा सिद्धांत लक्षात घेतला की झालं!!"काही जणांनी तर सेक्स आणि ऐहिक सुखं या एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते एकत्र आले.." अशीही विशेष टिप्पणी केली...काहीही असू दे की..हे जे काही आहे ते त्या जोडप्यांना, त्यांचं त्यांना ठरवू दे की...आयुष्यभराची साथ आणि नात्यांचं आवरण जरा बाजूला सारून पहा...लग्नाचा मूळ उद्देश शेवटी हाच असतो नं.. कोणत्याही देशात,कोणत्याही धर्मात,कोणत्याही संस्कृतीत..
     इतर सगळं बाजूला ठेवूया.. पण लोकांच्या आयुष्यात त्यांनी काय करायचं,कसं वागायचं याचे धडे देणारे आपण कोण?काय अधिकार आहे आपल्याला?? बरं हे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत असंही काही नाही..हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून' असं झालं! हे अगदी साफ नामंजूर आहे मला...आणि म्हणूनच  हेफनर  आणि क्रिस्टलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत..लग्नासाठी आणि आपल्या निर्णयावर जगाला काय वाट्टेल ते वाटलं तरी,त्याची अजिबात तमा न बाळगता ते ठाम राहिले म्हणून.. Wish them a very happy married life!!इति एका लग्नाची गोष्ट,साठां उत्तरी सुफळ संपूर्ण!!!!  

21 comments:

 1. 1 number lekh ahe Spruha!! mast ch ekdum :)

  ReplyDelete
 2. Good view point Spruha,but we have to wait for at least year or couple of year to comment before and see whether they really happy or not.... this is applicable for both sides one who support this and other who oppose this..... What say???

  ReplyDelete
 3. थोडक्यात सक्सेसफुल "जॉगर्स पार्क" इष्टोरी हाय ह्यो!!!

  मला लेख वाचून पाडगावकरांची "त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केल ... मला सांगा त्यात तुमचं काय गेलं???" ही कविता आठवली.

  ===
  BTW Pradesh also have point.

  ReplyDelete
 4. Similar controversy arose in India when Sania Mirza married Shoaib malik. These people are caught up in false notions of patriotism in her case, and false notions of "morality" in the case of Hugh Heffner.. may God bless them... ajun kaay bolNaar? :)

  ReplyDelete
 5. tuze vichaar kharokhar patale aani aavadle suddha......arthat tuza ha lekh tuze mat kiva tuzi baaju nustich present karat naahiye tar wachanaryachya manawar thaasvat aahes tu tuze vichar......ya lekhadware tu samaajajachya swarthi aani narrow minded vicharsarni war ek parkhad uttar tar dile aahes shivay 'LAGNA' ya vishayakade atishay maarmiktene baghanyacha tuza drushtikon nishchitach ullekhniya aahe.......
  ........pan spruha, prem aandhale.....vagere mala sare kabul aahe; pan ek prashna nehami mala padto ki....PREM KARNAARE AANDHALE ASATAAT KA?
  ......nahi.....me dusari baaju maandat naahiye....pan TRUST ani COMMITMENT chi patti dolyanwr laavun GAANDHARI pramaane aadhi wagayche ni war mhanaayche "everything is FARE" he thodase khatakte mala! .....
  BAND ani UGHADYA dolyani aaplyala keval priyakar kiva preyasich disat raahili tar BHAVISHYA kase disanaar!! mhanun tar ajunahi jagala kode padale aahe--"whether mind exist in heart or in BRAIN."
  SHARAD RAJENDRA NILE.

  ReplyDelete
 6. खूपच छान लिहिलं आहेस तू स्पृहा. ही गोष्ट अगदी बरोबर आहे की लग्न करणं, संसार करणं, प्रेम करणं या फक्त दोन जिवांच्या, दोन मनांच्या गोष्टी असतात. त्यात इतरांनी पडू नये. हेय वाचताना ह्युग हेफनर आणि क्रिस्टल हार्रीस अत्यंत प्रामाणिक अशी आदराची भावना निर्माण होते. की समाजाची पर्वा न करता त्यांनी हेय पाऊल उचललं.

  ReplyDelete
 7. hmm... ha issue maybe to shrimant nasta tar jhala nasta..or to shrimant nasta tar tyacha lagna tichyashi jhala nasta .. asa mala vatat :P

  ReplyDelete
 8. Its all about selling gossips instead of concentrating more important issues like poverty, governance,literacy or health etc. by the new age media & journalism.

  Premacha swarup kahihi asla, tyacha anta kahihi asla tari prem karna kivva nahi ha itaranchya charchecha vishay nakkich nahi........

  ReplyDelete
 9. Nice article,I agree that it is their personal life and the decision should be lift to both of them but the personal history of Mr.Hugh Hefner should not be taken out of equation.If you see his earlier adventures then the notion of bonding of mind and true love seems to be extremely generous to him.

  ReplyDelete
 10. मस्तच ...आज काल आपण दुसर्यांच्या गोष्टीत जरा जास्तच लक्ष्य घालतो असे मला वाटते ... कारण प्रत्येकाला असे वाटत असते कि दुसर्यांचे लीफे खूपच चांगले असते...जरा दुसर्यांना त्यांचा हवा असलेला space द्या...तुमचेच भले होईल...

  ReplyDelete
 11. ha lekha tasa me khuup ushira wachat aahe... pan tyane kahi farak nahi padat.. vichar tar taajech asatat na.. nehmich... Agreed with your thoughts Spruha Joshi.

  ReplyDelete
 12. हे जर उलटं असतं तर...तरी देखील हीच प्रतिक्रिया असती का...म्हणजे आजीच्या वयाच्या स्त्रीने नातवाच्या वयाच्या मुलाशी लग्न केले असते तरची........

  ReplyDelete
 13. तुमचा हा लेख वाचून मला तुमच्यातल्या स्पष्टवक्तेपणा आणि व्यक्तीस्वातंत्र्य या बद्दल आग्रही असलेल्या स्पृहाशी नव्याने ओळख करून दिली. प्रचलित समाज हा नेहमीच व्यावहारिक जीवन सरनीला भावनांपेक्षा जास्त महत्व देत आला आहे नाही का? त्यामुळे भावनिक बाजूने विचार करण्याचा कल असणाऱ्यांना नेहमीच फिल्मी आणि नौटंकी अशी दूषणं लावली जातात. असो, तुमचे विचार पटले मला. असेच आणि वैविध्यपूर्ण विषयांवर तुम्ही वारंवार लिहावा असा गोड अट्टाहास....!!!!

  ReplyDelete
 14. Actually prob acceptance level cha ahe vayacha nahi. Apan sarve jan nirnayat phayada shodhato mhanun chuk ki barober hyach apal ganit normally chukatach.
  Ofcourse time will b best indicator in this case.

  ReplyDelete
 15. Very nice article.It will really force people to rethink

  ReplyDelete