Saturday, November 19, 2011

'त्यात काय एवढं'...!!!!

तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? झपाट्याने बदलत जाणाऱ्या मध्यमवर्गाचं निरीक्षण करायचं असेल तर या एक नंबर जागा आहेत.. खूप मजेशीर दृश्य.. गेल्या दशकामध्ये मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागला, आणि हळूहळू मॉल कल्चर आपल्याकडे रुजायला लागलं. अशा सुपर मार्केट्स मध्ये आता स्पष्ट दिसतो, तो आपल्या लोकांचा बदललेला स्वभाव. हसरेपणा, ऋजुता यांचा लवलेश नसणारा..चढलेली भुवई, आणि चेहऱ्यावर तुच्छतादर्शक भाव.. आणि आपण किराण मालाच्या फडतूस दुकानात नाही, तर एसी मॉल मध्ये शॉपिंग करतोय या गोष्टीतून येणारा एक विचित्र अहंभाव! हा माजोरीपणा कशातून येत असेल?

त्यादिवशी एका सुपर मार्केटमध्ये गेले होते. वर केलेल्या वर्णनासारखाच एक सूट- बूट, कॉलर, टायवाला इसम, हातात उंची आयफोन, तंद्रीत चालताना त्याची  ट्रॉली एका छोट्या मुलीचा पायावरून गेली. ती बिचारी मुलगी कळवळली. बाजूला तिची आईउभी होती. साहजिकच तिने त्या माणसाला हटकलं, अगदी सौम्य शब्दात.. तर तो तिच्यावरच गुरकावला.."हां.. मग ठीक ए ना.. त्यात काय एवढं.. होतं असं.. एवढं काय नाटक!" अरे...ही कुठली पद्धत??? अर्थात तो विषय वाढला, चार तमासगीर जमले, बाचाबाची होऊ घातली.. बोंबाबोंब, कर्णकटू, कर्कश आवाज.. सगळी शांतता हरवून गेली.. वातावरणाच विसकटलं.. आणि ती छोटी मुलगी मात्र एका बाजूला एकटीच उभी होती.. केविलवाणी! जो प्रसंग, "आय एम सॉरी" म्हणून सहज संपला  असता, त्याजागी 'त्यात काय एवढं' या बेपर्वा, मुर्दाड उत्तराने हे सगळं रामायण  घडलं.

किती विचित्र आहे हा एटीट्युड.. म्हणजे ज्या बेपर्वा वेस्टर्न अप्रोचला, त्यांच्या 'व्हॉटेव्हर' कल्चरला आपण उठसूठ नाकं मुरडतो, त्याला शब्दशः समानार्थी आहे हे 'त्यात काय एवढं'!! आमच्या वयाच्या सगळ्यांमध्येच आलीये ही वृत्ती. प्रेमात पडणं, त्यात अयशस्वी होणं, एखादी परीक्षा देणं, त्यात घसरून पडणं, पैसे उडवणं.. यादी वाढते, वाढतच जाते.. सगळ्याला उत्तर एकच..'त्यात काय एवढं'!! आणि आपली कमाल तर त्याहूनही पुढे आहे. या सगळ्याला एकदाच 'नशीब' असं शुगर कोटेड आवरण चढवलं की खल्लास! आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं..' नशीब!'; सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये..'नशीब!' बसच्या रांगेत कोणीतरी तुम्हाला धक्का देऊन घुसलं, 'नशीब!' एखाद दिवस तुम्हीच समोरच्याला धक्का देऊन विंडो सीट पटकावलीत.. तेही 'नशीब'! (यावेळेस स्वर मात्र हसरा!) कशी मस्त साखळी आहे नाही? भारतीय मानसिकतेला तसंही समोरच्याला 'सॉरी' म्हणणं अपमानास्पदच वाटत आलंय म्हणा! ' मोडेन पण वाकणार नाही' हा आपला इतिहास प्रसिद्ध बाणा नाही का! 'चांगलं' असण्यापेक्षा 'कणखर' असण्याला का इतकं महत्त्व? बरं तो कणखरपणासुद्धा आयत्या वेळेस नांगी घालतोच.. आपल्या फायद्याच्या वेळेस बरोब्बर लवचिक होतोच! मग आपल्यापेक्षा कमकुवत लोकांमध्ये हे शौर्य कशाला पाजळतो आपण? त्यामुळे अशा स्वभावांना 'सॉरी'पेक्षा 'त्यात काय एवढं' हेच जवळचं वाटणार! वादातला शेवटचा शब्द.. ब्रह्मवाक्य हे आपलंच असायला हवं! ते त्या मुळमुळीत 'सॉरी' ने थोडंच साधलं जाणार!

विचार करून बघा.. आपल्या नकळत असेच वागत असतो आपण. लहानपणापासून किती जणांना 'प्लीज' म्हणायची सवय असते? बालहट्ट हे नेहमीच किंकाळ्या आणि आरडाओरड्याने व्यापलेले असतात.. त्यांचं 'कित्ती गोड!!' असं कौतुक केलं जातं. आणि मग तीच सवय लागत जाते. लहान असतानाचे हे  लाडिक चाळे मोठं झाल्यावर सार्वजनिक आयुष्यात समोरच्याला भीषण वाटू शकतात, अगदी आपण नकोसे वाटू शकतो, हा विचार किती पालक करतात? त्यामुळे 'नम्रता' हे शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवलेलं, आणि इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच 'सोडून द्यायचं' एक मूल्य उरतं..

त्यामुळे हा माझा लेख वाचल्यावर समजा तुमच्या मनात आलं, 'त्यात काय एवढं' तर ती तुमची चूक अज्जिबात नाही बरं का!! आणि मीही तुमच्यातलीच असल्यामुळे, 'सॉरी' म्हणण्याच्या फंदात मीही पडणार नाहीच!!! कारण एकच...'त्यात काय एवढं'...!!!!

33 comments:

 1. Khupach chan nirikshan ani parikshan dekhil.
  Pan yavar kay upay kadhata yeil yavar ata vichar zala pahije, nahi tar itar anek prashanan sarkha ha dekhil anuttarit mhanun rahil.
  Ani mala kharach vatat yacha praytn tumhi nakki kara; tumachi bhasha oghavati ahe ani vichar spasht. Yacha fayada samasya pariharat nakki hoil :-)

  ReplyDelete
 2. @swaroop,
  त्यावर उपाय म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे. हल्ली पालकच बेजबाबदार वागतात "त्यात काय एवढं" हे सुध्दा कमी पडेल इतका उर्मटपणा करणारे पालक आणि तशीच वृत्ती आपल्या मुलांमध्ये रूजवणारे पालक मी बघितलेत.. बेदरकार आणि माजोर्डे.. तिथे मुलांना तरी काय दोष देणार.. त्यामुळे चांगली सुरूवात आपणच करायला हवी.. आपण आपला चांगुलपणा, सद्गुण टिकवून ठेवूया (भले जग त्याला काही म्हणो) :)

  ReplyDelete
 3. SO Nice ,
  Now a days it is important for our INDIAN day by day we copy others ,& we leave our old ......
  Thanks
  Bhadange Shivshankar

  ReplyDelete
 4. Yeah, this is really disappointing, reason being, we follow WEST blindly. In most of West countries in schools, tie is necessary due to environmental condition, but we despite having humid weather wants kids to wear tie, because WEST, does that.
  We feel whatever they do is correct and want to just follow it. Even TV shows are imported, Indian Idol, KBC, Big Boss, and many more. We are losing our own identity.

  ReplyDelete
 5. Paschimatya sanskaar he gharatil chidra tun ach dokavtaat. Tee chidra padu nayet ani padlee tar tichya chira ani kaalantarane bhagdaad hou naye, yachi jaaneev kiti janaana ahe? Barr ahe tar amalbajavni kaay hoat ahe tyavar. Sanskaar he gharatunach ghadtaat asa mhan na purna pane chukicha ahe ka? Baherun alele sanskaar kiti shosaave he mahatvaacha ahe. Halli Aaai baapalach vel nahi nashta karayla sanskaar kashashi khanaar???

  ReplyDelete
 6. पूर्ण प्रकारामधे मला २ गोष्टी दिसल्या .... आई वडिल संस्कार तर करत नाहीत अस नाही . पण वाढत्या मॉल्स अणि वेस्टर्न कल्चर मधे हैं विसरून पण चालणार नाही की कुठे तरी या गोष्टी आपणच वाढवल्या आहेत. आई बाबा मुलाना खाऊ आणायचे कुठे गेलेत ते दिवस ? आमच्या आई ला निवृति ला १ वर्षा बाकी आहे तरी पण आमची आई अजून पण ऑफिस मधून संध्याकाली येताना काही तरी खायला घेऊन येते.. अणि त्यात अजून पण तेच प्रेम अणि जिव्हाळा आम्हाला जाणवतो.... त्याच प्रमाणे तीच सवय आम्हाला आहे... मी पण इथे ठाण्यात घरी जाताना काही तरी खायला घेऊन जातोच की अधून मधून.

  थोडक्यात काय आपण जसे आपले घर घडवू तसच आपली मूल त्यांचे घर आणी संस्कार रुजवतील.

  स्पृहा पुन्हा एकदा मराठी माणासालाच मराठी माणासाला हे समजवाव लागता हेच तर दुर्दैव झाल आहे. अत्कृष्ट प्रयत्न आहे हां तुझा लिखाणा द्वारे.

  Nice writing :)

  ReplyDelete
 7. संस्कारांचा अभाव. स्वातंत्र्याचा अतिरेक, शिस्त ह्या संकल्पनेला तडा देण्याच्या वृत्तीला मिळालेला राजाश्रय. त्यातून जन्माला आलेला उर्मटपणा, दुर्दैवाने त्यालाहि मिळत असलेला राजाश्रय.
  सर्वच काही खिन्न करणारे आहे.
  आज शिस्त, संयम, आदरभाव, निस्सीम प्रेमळपणा इत्यादी
  गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या पदरी उपेक्षा, निराशाच पडते.
  ह्या सर्व गोष्टींवर चर्चा अथवा विचार मंथन करता प्रत्येक वेळेला
  आजचे स्वार्थी राजकारणी, आणि त्यांच्यामुळे बोकाळलेला चंगळवाद ह्याच गोष्टी सरते शेवटी जबाबदार ठरतात. दुर्दैव.... दुसरे काय ?

  ReplyDelete
 8. स्पृहा...तुझा लेख आणि त्यावर आलेले अभिप्राय वाचून खरंच छान वाटले. अजूनही काही जण आहेत ज्यांचे 'संस्कार', 'नैतिकता' आणि 'माणुसकी' या संकल्पनेवर साधारण एक सारखेच विचार आहेत हे बघून खूप समाधान वाटते. नियमितपणे मी तुझे पोस्ट्स वाचत असतो. तुझ्या पोस्ट्स मधून तुझे विचार कळतात, तुझा दृष्टीकोण कळतो. तुझे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
  खुपच छान...मस्त!

  ReplyDelete
 9. Spruha,
  Kuphach chhan nirikshan...! Madhyam vargiyanchya kade paisa aalyanantar Sanskaar kuthalya kuthe jaatat tech kalat nahi ....
  Pan yaala paishyachi gurmi asahi mhanata yenar nahi ... he tu ya ghadalelya ghatanechi sanskaraashi ji link lavaliye tyavarun vaatate.

  varacha lekh tujhya vicharsarnichi ek jhalak dhaakhavun jaate.

  Ani ho, sarvaninch polite rahile tar khup saare prashna vina tanta ani vina vilamb sutale asate.
  Mhanun sanskaar he lahanpanapaasun zhaalech pahijet.

  Sarvaanchya comments hi khup chhaan aahet.

  ReplyDelete
 10. एक गोष्ट तर नक्की आहे ती म्हणजे संस्काराची आपल्या आई बाबांनी आपल्या वर कोणत्य प्रकारे संस्कार केले आहे ते त्याच्या स्वभावरून कळते इतरांना कामाला लावण्या पेक्षा आपणच सुरुवात केली तर ,आपले नशीब आपणच तर घडवत आसतो
  म कोणती हि घटना घडली तर त्याला जबादार नशिबच का दोष आपल्या करणी /किवा रीतसारणी ला द्या आपण कुढे तरी चूकतोय याची जाणीव आसू द्या आणी काही वाईट लिहले असल्यास.
  ... त्यात काय एवढं...
  आणि तुम्ही ज्या गोष्टी अनुभवल्या त्या कौतुकास पात्र आहे कारण तुमच्या द्वारे काही न काही तरी शिकतोय

  ReplyDelete
 11. Ya goshti kiti sahaj disun yetat pan khup khol rutun bastat. Pan apan pravrutti naakaru shakto, astittva nahi. Chaan lihilay.

  ReplyDelete
 12. खरं म्हणजे यात संस्काराचा भाग नाही. आज प्रत्गेकाला एवढा वेळच नाही आहे कि काय होतंय हे बघायला. त्यामुले आपण कसे वागतो आहे हे आपल्यालाच समजत नाही. पण मौल संस्कृती हे एक स्टेटस सेम्बोल झाला आहे. मौल मध्ये सगळय गोष्टी स्वस्त मिळतात म्हणून आज सगळे तिथेच गर्दी करतात. वाण्याकडे घासघीस करून घेणारी बाई मौल मध्ये मात्र आहे त्या किमतीला वस्तू विकत घेते कारण त्यावर काही तरी फ्री आसता म्हणून. मौल संकृती आगदीच नको आसं नको ती हवीच. ती झाली नाही तर शहरीकरण झाला आहे आसं वाटणार नाही. त्यामुळे आपल्यालाच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. स्पृहा खरच चं छान परीक्षण आहे.

  ReplyDelete
 13. Hmm...nirikshan ani Lekh Jamla ahe..pan aik na..pudhchya vele pasun formatting ani text alignment vyavasthit kar na..plz..Vachayla maja yeil

  ReplyDelete
 14. Tumcha lekh thoda late vachanaat aala.......aatachi paristhiti ani lokanchi vichar karaychi paddhat ekdam uttam ritya mandleli aahe......aaj kaal lokanche jeevan hey swa-kendrit zaale aahe tyacha ha parinam asava bahutek...."tyala trass hotoy mag mi kay karu" ha drushtikon ruju lagla aahe......yaala 30% sanskar ani bakiche 70% hi aaju bajuchi parishti karnibhut aahe. PAn thoda ajun vichar kela tar ha whtaever/i don't care wala attitude jar yogya prakare waparla tar tyacha positive parinam hou shakto.....jase ki mulala/mulila parikshe madhe kami mark milale tar aai babani....tyat evadhi mothi goshta kay ti pudhchya weli nit abhyas kar asha tarhene waparlyas tyache changle parinam sudha hou shaktat....arthat asa attitude chi intensity kiti ani kevha asavi yacha praman perfect asayala hava else tyache adverse effect sudha hou shaktat!!!

  ReplyDelete
 15. Mitraho, saglyanche khoop khop abhar! itka vichar manthan zala, tyatun ek goshta nakki ki he aplya saglyanach khataktay.. apan aplyapasun suruvat karuya!!!! kharach bara vatala..:-)

  ReplyDelete
 16. मला तुझ्या लेखाचा विषय आवडला..पण माझं western culture बद्दलचं मत जरा वेगळं आहे. परदेशात लोक Indians पेक्षा खूप जास्त काळजी घेतात या गोष्टींची.. ते लहानपणापासून मुलांना social manners शिकवण्याचा अट्टाहास करतात.. मुलांनी इतर लोकांशी उर्मटपणे वागलेले त्यांना अजिबात खपत नाही.. त्यामुळे मोठेपणी सुद्धा लोक एकमेकांशी माणुसकीने वागतात.. भारतीयांनी आपल्या चुकांचे खापर उगाच western culture वर फोडू नये.. India मध्ये आपण साधारण नेहमी 'चलता ही यार' attitude ठेवतो, तो जास्तकरून ह्या गोष्टींना कारणीभूत आहे.. thankyou , sorry हे आपल्याला खूप formal वाटते, म्हणून ते टाळले जाते.. ह्या विषयाला हात घातल्याबद्दल तुझे अभिनंदन..

  ReplyDelete
 17. farach chhan pane lihila ahes spruha tai.... n rytly said survat hi aplya pasunach!!!!!!!

  ReplyDelete
 18. khup mast... thought provoking .. gambhir v4r karanya itpat mast...!! pn kharach shevti gaadi adte ti ithech...
  " tyat kay evdha".. :(

  ReplyDelete
 19. kalatay pan valat nahi.....
  asa kahisa zalay

  ReplyDelete
 20. Mala Asa Vatta Hya Vicharsarnila Jevdha Western Culture Jababdar Ahe Tevhdach Apla Samaj Suddha.......Ekada Foreignla Gelay Kivva Jaun Aalay Ani Dollars Madhe Kamavtoy....Yacha Kavtuk Kityakda Kani Padta...Ani Tyacha Udahran Dila Jata...Kuthetari Paisa Hach Sarvshresht Ashya Samjutit Bhar Padliy.....Ekadyacha Kavtuk Tyachya Manuski Ani Kalela Sodun Kashyacha Hi Hou Naye... Karan Tya Pathvivarchya Thapechach Tya Gurmipanat Rupantar Hota...!!

  ReplyDelete
 21. great observation ! another thing one can notice about people roaming in a mall is they are under some sort of hypnotism smart consumerism lies in making your target subjects your slaves while they have a feeling of complete autonomy.

  ReplyDelete
 22. khara ahe... ani aaj-kal kahi middleclass lokachya hatat jara paisa ala ki te lagech harbharyachya zadawar chadhatat, asha vyaktini nakkich ha lekh wachala pahije.... apratim!!!!

  ReplyDelete
 23. या सर्वांला कारणीभुत आहे तो आपला अहंकार आणि स्वार्थी होत चाललेला स्वभाव. त्यामुळे जगातल्या लोकांचा विचार तर फारच लांब पण घरातल्यांचा आपुलकीने विचार करण्यास वेळ आणि वृत्ती दिसत नाही.
  तुमचे विचार वाचुन बरे वाटले... आजकाल गर्दी जास्त आणि दर्दी कमी दिसतात.

  ReplyDelete