Thursday, June 11, 2015

बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही

बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही
सावली सांज ही, ये तशी लाजुनी
गुंतला जीव माझा, थांग ना या नभाचा
साद ये कोठुनी? धुंद वेड्या मनी..!

आस ही या मनी आज का जागली
ही मिठी रेशमी धुंद वेडावली
जीव होई तुझा श्वास सारे तुझे
दूर तू का तरी भास सारे तुझे
बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही..

गुज हे लाजरे उमलली पाकळी
चांदवा माळूनी वाट झाली खुळी
स्पर्श होता तुझा हरपले भान हे
सोबतीने तुझ्या रान गंधाळले
बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही..


Movie : Baavare Prem He
Singer : Bela Shende & Hrishikesh Ranade
Music : Ajay Kishor Naik
Lyrics : Spruha Joshi

2 comments:

 1. मृगजळ हे प्रेम
  कसा थांग लागावा
  क्षणात श्वास मिसळले
  क्षणात हा दुरावा …
  अश्रु ही अधीर
  कसे भेटण्यास
  क्षणात आवाज मधाळ
  क्षणात ही शांतता ….
  मोकळ्या नभातही
  चित्र उमटले
  क्षणात खळी खोल
  क्षणात भकास आकाश ....

  ReplyDelete