Friday, April 1, 2011

'द ट्रुमन शो'!!

परवाचा 'नॅशनल मोहाली डे'...(आपली पाकिस्तान बरोबरची मॅच हो...!!!) धोनी ब्रिगेडने सार्थकी लावला.. धमाल आली...क्षणाक्षणाला वाढणारे हृदयाचे ठोके,आरोळ्या,चित्कार..सगळं काही एकदम टिपेचं.. तशी भारत-पाकिस्तानची मॅच म्हटल्यावर वातावरण निर्मिती आपली प्रसारमाध्यमं जीव तोडून करतच असतात.. त्यात यंदा गिलानी साहेब मोहालीत अवतरले होते..सिंग साहेबांचा मान राखून..त्यामुळे बातम्या इतक्या मजेशीर वाटत होत्या ऐकायला,की काय विचारता...!! म्हणजे एकीकडे 'अब क्रिकेटही लायेगा अमन का पैगाम',तर दुसरीकडे 'कौन जितेगा घोर महायुध!!!!' तापल्या तव्यावर मीठ मोहरीची फोडणीच जशी!!! मीही भारतीय आहे..परवाची मॅच बघताना मीही तितकीच एक्सायटेड होते..कामासाठी बाहेर असताना अधीरपणे कानाला मोबाईल लावून स्कोअर ऐकत होते..त्यांच्या विकेट्स पडल्या की ओरडत होते...पण म्हणून महायुद्ध????? मला अशा सगळ्याच अतिरेकी कमेंट्सचा खूप त्रास होतो...आपली मॅच होती ना,त्याच्या दोन दिवस आधीपासूनच अशा आचरट एसेमेसेसनी वैताग आणला होता..कंटाळा आला मला ते डिलीट करूनसुद्धा...कशासाठी आपलं देशप्रेम इतक्या सवंग पद्धतीने व्यक्त करतो आपण?किती बालिश वागतो...त्यातली भावना प्रामाणिक असेलही कदाचित;पण तिचं जाहीर रूप किती हिडीस झालेलं असतं...
मला क्रिकेट अतिशय आवडतं..अगदी मनापासून.. पण गेल्या काही वर्षांपासून माझा या स्पर्धांवरून मात्र विश्वासच उडत चाललाय..इतर खूपशा छान गोष्टींवरून उडत चाललाय तसाच.. हा वर्ल्ड कपही लुटू पुटूचा वाटतो...आपण जिंकल्यावर आनंदही होतो; मग लगेच वाटतं,हे जिंकणं 'खरं'असेल? एखाद्या फिल्डरच्या हातातून कॅच सुटतो; मनात प्रश्नचिन्ह..कॅच 'सुटला',की 'सोडला'?? अनुभवी फलंदाजांनी मारलेला शॉट नेमका समोरच्या फिल्डरच्या हातात अलगद विसावतो...एक क्षणभर त्याच्या फिल्डिंगचं कौतुक वाटून जातं आणि मग लगेच शंका..विकेट 'गेली',की 'फेकली'... खूप वाईट वाटतं मग...स्वतःचाच राग येतो..आपण आपला हा आवडता खेळ,'खेळ' म्हणून पाहूच शकत नाही.या भावनेने कोंदून गेल्यासारखं होतं... वर्ल्ड कप..की एक 'इव्हेंट' फक्त.. कोट्यावधींचा.. जाहिरातीचा... प्रायोजकांचा.. .बेटिंगचा... पैसेवाल्यांचा..अर्थकारणाचा.. सत्ताकारणाचा..साध्या-भोळ्या माणसांच्या भावनांचा..एक 'खेळ' फक्त..!!!
परवा मॅचच्या दिवशी कौशल इनामदारशी गप्पा मारत होते.बोलता बोलता कौशल दादा म्हणाला, आपला ना 'ट्रुमन शो' झालाय!!!! मित्रांनो,'ट्रुमन शो' हा एक खूप सुंदर इंग्लिश पिक्चर आहे...'रियालिटी शो' ची कमाल पातळी दाखवणारा...एका सामान्य माणसाच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी छुप्या कॅमेऱ्यात शूट केल्या जात असतात...त्याचं अख्खं आयुष्य सारी दुनिया बघत असते...तो मात्र एका आभासी जगात बंदिस्त...या सगळ्यापासून कोसो दूर..अनभिज्ञ...लोकांच्या डिमांडनुसार या ट्रुमनच्या आयुष्यातल्या गोष्टी घडवल्या-बिघडवल्या जातात...आणि तो बिचारा जगत राहतो..या आभासी जगालाच वास्तव मानून..मला कौशल दादाचं म्हणणं मनापासून पटलं...आपला 'ट्रुमन शो' झालाय...कठपुतळ्या आहोत आपण..नाड्या भलत्यांच्याच हातात..आणि आपण हसतोय,रडतोय,ओरडतोय,दंगली करतोय...त्यांना हवे तेव्हा..त्यांना हवे तसे...!!! ' ट्रुमन शो'!!!
सोमवारपर्यंत,वर्ल्ड कपची फायनल झाली असेल,कदाचित आपण जिंकलेले असू,इतिहासामध्ये धोनीची टीम इंडिया अजरामर झालेली असेल...कदाचित... त्यावेळी मीसुद्धा तुम्हां सगळ्यांसारखीच आनंदाने ओरडेन,नाचेन,जल्लोष करेन,वेडीपिशी होईन...पण...हा कुरतडणारा 'पण' मात्र आपली पाठ कधीच सोडणार नाही...आणि हीच या 'ट्रुमन शो'ची शोकांतिका आहे..!!


10 comments:

 1. स्पृहा,
  नमस्कार.तुमचा लेख वाचल्यानंतर या सर्व गोष्टीवर आपल्या स्वतःशीच विचार करायला भाग पाडले.आपण भारतीय क्रिकेट या खेळाचा थोडा अतिरेकच करतो,नाही का?त्या मध्ये निर्मळ आनंद नाही हे नक्की.असो,
  सुंदर लिहलय.शुभेच्छा.

  ReplyDelete
 2. फक्त क्रिकेटबाबत का? असा 'ट्रुमन शो' तर इतर अनेक बाबतीतही असतो! शिक्षण (आपण काय शिकायचं, कधी शिकायचं), राजकारण, धर्म (कोणत्या दिवशी काय करायचं) - हे सगळ 'कोणीतरी' ठरवत आणि ते आपण ते साधारणपणे विनातक्रार मान्य करतो!

  अर्थात आपल्या आवाक्यातले बदल आपण घडवावेत आणि उथळ देशभक्तीच्या नावे चाललेल्या match fixing च्या गावगप्पा फार गांभीर्याने घेऊ नयेत हेच खर!

  ReplyDelete
 3. maza mhanna tech ahe...match fixing ha ek mudda ahe phakta...Aplya ayushyacha truman show dar kshanalach chalu asto ho...apan tar sadhi mansa ahot...ani tech mi mhanaycha prayatna kartey!!

  ReplyDelete
 4. सिनेमातला ट्रुमन शेवटी शो च्या बाहेर पडतो.....आपणही पडू हीच आशा....एकूण खूप छान ब्लॉग पोस्ट....

  ReplyDelete
 5. मस्त लिहिलंय...

  ReplyDelete
 6. spruha!! after a long time i read you blog and am truly happy that you have said the correct thing. i think we should also rethink about anna hajare's protest against corruption. with due respect to him i honestly think that it's more a hype by media.. than a rational outburst and protest against corruption. i really think that unfortunately the world cup fever has boosted this spirit... and we have to check out =whether it sustains in the future. first of all we have to check whether we really know what corruption means truly? its basically in our system. it's quite human. and we can't win over it permanently.. pls. read the articles in indian express.. ht and even in marathi.. loksatta. they are courageous people who have wrote these articles.. this sense of achievement and way of celebration is totally vague and frivilious in nature. politicians have not come out of the blue. they are there because of us. and the mentality we carry with ourselves.. they are representing us. so.. geeting rid of them doesn't mean that we won.. or we have got freedom.. i simply dont understand how to relate with all this.. and even i am bit confused whether its going in a right direction or we are heading towards democratic anarchy..
  i hope you will understand what i am treying to say.. i haven't thought about it fully and have nort come tyo a full stop. its a process.. and that's what i mean.. we have nothing to celebrate.. no point in enjoying the so called victory.. lets wait and watch and till then try to be the change we want.. what say?

  ReplyDelete
 7. Very true Chinmay..!!Rationally vichar karnarya saglyanna tuza he mhanna patel..I'm very much sure about that..ya vishayavar aajcha Loksattetla Girish Kuberancha lekh plz vach..Gives a new insight!!Thanx 4 commenting so generousely..

  ReplyDelete