Thursday, October 20, 2011

स्वप्न माझे..

हे उमलत्या पाकळ्यांचे स्वप्न माझे 
चिंब भिजल्या आठवांचे स्वप्न माझे..

चांदण्यांचा खेळ चाले शांत राती,
हासले पाहून त्यांना स्वप्न माझे..

आज येथे साद दे हळुवार कोणी
पाहते तो थांबलेले, स्वप्न माझे..

वाट माझी वेगळी ही शोधिली मी,
भेटले वाटेवरी अन स्वप्न माझे..

एकटी मी चालले वाटेवरी या,
आज माझ्या सोबतीला स्वप्न माझे..

-स्पृहा. 

19 comments:

 1. nice..really liked it...kharach asta asa.....

  ReplyDelete
 2. Khup chaan aahe....
  Swapn tuze...

  ReplyDelete
 3. spruha, khup sundar lihila ahes.......

  ReplyDelete
 4. नमस्कार,’रेषेवरची अक्षरे’ (http://reshakshare.blogspot.com/)या दिवाळी अंकासंदर्भात तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमचा ई-पत्ता मिळेल काय?
  -संपादक मंडळ, रेषेवरची अक्षरे (resh.akshare@gmail.com)

  ReplyDelete
 5. SPRUHA tu tuzya swapnanna khupach chhan shabdabaddha kel aahes,APRATIM!!!!!!!!!!!!

  ReplyDelete
 6. झाली पहाट
  तरी धुके दाट
  पहावी वाट
  येण्याची तिच्या

  आता वेशीवर
  हृदयाची लक्तरं
  कशाला लवकर
  यावे तिने?

  गेला गेला दिवस
  आता एकच आस
  संध्याकाळ उदास
  होऊ नये

  आली शुक्राची चांदणी
  गंधाळली रातराणी
  माझ्या विश्वाची राणी
  आली की काय?

  मनाचा पिसारा
  अंगभर शहारा
  तिला विचारा
  काय करू?

  - यशोधन

  ReplyDelete
 7. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 8. मित्रांनो धन्यवाद..! आणि यशोधन कविता आवडली..मस्त आहे.

  ReplyDelete
 9. १. काही तरी करण्याच्या नादात मी चुकून माझी कॉमेंट डिलीट केली :(
  २. आपल्या स्तुतीच्या प्रतिक्रियेसाठी माझ्या जवळ शब्द नाहीत.

  १ + २ = मी बावळट आहे!

  ReplyDelete
 10. सुंदर कविता पण....
  तुम्ही लेख खूप चं छान लिहिता
  तुमच्या कडे लेखन कौशल्ये मस्त आहे.

  ReplyDelete
 11. sarvach chhan. vaachtana maja aali. thank u all.

  ReplyDelete
 12. yashodhan saheb, aapli kavita ekdam mast.

  ReplyDelete
 13. Itke sundar kase lihites tu? You have a GOD's gift. Keep it up!

  ReplyDelete